शेवगाव प्रतिनिधी ,दि. २० : राक्षीच्या केदारेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित कै. सै. सुनीता एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक आणि इंद्रायणी इन्फ्रास्ट्रक्चर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये नुकतीच स्थापत्य अभियांत्रिकी पदविका मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले. त्यात आकर्षक वेतनावर तीघांची निवड करण्यात आली.
इंद्रायणी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट प्रमुख प्रमोद गुजरे आणि महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीद्वारे तीन विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. निवड झालेल्यामध्ये अभिषेक गरड, असिफ शेख, उजेब पठाण या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ढाकणे पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये शिकलेला कोणीही विद्यार्थी वीना जॉबचा राहू नये यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील असते.
त्यासाठी राज्यातील विविध औद्योगिक वसाहतीतील आघाडीच्या उद्योग समुह, संस्था व एजन्सीज समवेत सातत्याने संपर्क साधून राक्षी येथेच मुलाखती ची व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा खर्च व वेळही वाचतो. येथील मुलाखतीचा अनेक विद्यार्थ्याना फायदा झाला आहे.
केदारेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांचे हस्ते इंद्रायणी इन्फ्रास्ट्रक्चरचे गुजर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रियाजखान अत्तार उपस्थित होते. स्थापत्य विभाग प्रमुख आय. एन पठाण यांनी आभार मानले.