उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा – प्रमोद लबडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : महाराष्ट्र आज दिशाहीन झाला आहे. सामान्य जनता वर्तमान राजकीय परिस्थितीमुळे संभ्रमात आहे. संपूर्ण जगाने कोविड काळात मान्य केलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी महाराष्ट्रतील सर्वसामान्य जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांना चांगले आरोग्य व दिर्घ आयुष्य लाभो आणि जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण होवो याकरिता कुंभारी येथील प्रभू रामचंद्राने स्थापन केलेल्या राघवेश्वर मंदिरात  51 शिवसैनिकांनी महंत उंडे महाराज व गुरुजींच्या मंत्रोपचारत महाअभिषेक करून शिवचरणी साकडे शिवसैनिकानी घातले.

इरशाळवाडी सारखे समृद्धी महामार्ग असेल इतरही ठिकाणी अनेक दुर्घटना सातत्याने होत आहेत. निसर्गही कोपल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे जन्म दिवस साजरा करू नये, अशा सूचना पक्षप्रमुखांच्या होत्या. मात्र हिंदू जननायक असलेले सर्वांच्या हृदयात आढळ स्थान निर्माण केलेले महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहोचलेले उद्धव साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने कोपरगाव शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी यांनी विविध कार्यक्रम घेतले. सकाळी लायन्स मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शहर प्रमुख सनी वाघ यांच्या संकल्पनेतून मिष्ठांन भोजन देताना दरवर्षी हाच कार्यक्रम करण्याचे ठरवले. 

दुपारी कुंभारी येथे महंत उंडे महाराज यांच्या उपस्थितीत महाअभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. तसेच कुंभारी गो शाळेतील गोधनास तीन टन चारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनाही मिष्ठांन भोजनाचा कार्यक्रम सायंकाळी घेण्यात आला. 80 टक्के समाजकारण करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबरोबर माझ्या शिवसैनिकाने उभे राहावे. या शिकवणीने प्रेरित झालेला प्रत्येक शिवसैनिक आज तळागाळात काम करत असून महाराष्ट्रातील शेतकरी व्यापारी सामान्य जनता बेरोजगार आज उद्धव साहेबांकडे मोठ्या आशेने पाहत आहे. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी उद्धव साहेबच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या. 

यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, उत्तर नगर जिल्हा महिला आघाडी सौ. सपना ताई मोरे उपजिल्हाप्रमुख असलम शेख, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख सनी वाघ, भरत मोरे,अनिल आव्हाड, रवींद्र कथले, राजू भाई शेख, रंगनाथ गव्हाणे, राहुल होन, गिरीधर पवार, गगन हाडा, संतोष नाना जाधव, अमोल शेलार, गणेश जाधव, धर्मा जावळे, दीपक वाघ, शिवाजीराव रोहमारे, चंद्रकांत भिंगारे, कृष्णा अहिरे, राखी विसपुते, पायल ताई पवार,सिद्धार्थ शेळके, नितेश बोरुडे, भूषण पाटणकर, विजय भोकरे, रुपेश सिंगर, वसीम चोपदार, नाना मोरे, महेश गायकवाड, गणेश घुगे, सोनू आव्हाड, सुनील दवंगे भाऊसाहेब व्हरे, रवींद्र डांगे श्री क्षेत्र रघवेश्वर देवस्थानातील सर्व संत महंत उपस्थित होते.