जिल्हा परिषद शाळा करंजी बुद्रुक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : शैक्षणिक वर्ष 2022 – 23 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा करंजी बुद्रुक येथील श्रीज्या मोहन रासकर या विद्यार्थिनीने 300 पैकी 266 गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. तर दाक्ष नारायण भवर या विद्यार्थ्याने 300 पैकी 226 गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत 277 वा आला आहे .

शाळेतील संग्राम भारती, आकांक्षा आहेर, अलकनंदा निरगुडे, तेजल औताडे, विराज दिवटे व इयत्ता ८ वी ची अक्षरा थोरात हे विद्यार्थी पात्र झाले असून त्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक मोहन रासकर, मुख्याध्यापक अशोक आहेर , ज्ञानोबा चव्हाण, नंदकुमार थोरात, सुमेश हांडे, सुनिता गायकवाड, सलीम शेख, शरद शिंदे, नितीन कुलट, एकनाथ गोंदके, बाळू धिंदळे या शिक्षकांचा नुकताच सन्मान सोहळा अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विमल कारभारी आगवण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 

आगवण म्हणाल्या, जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य असावे लागते. स्पर्धा परीक्षेचा पाया हा जिल्हा परिषदेच्या शाळेतच घातला जातो, असे मत शिक्षण समिती सदस्या विमलताई आगवन यांनी मांडले. शिक्षण विभाग पंचायत समिती कोपरगाव व जिल्हा परिषद अहमदनगर यांनी वर्षभरात घेतलेल्या सराव परीक्षांचा विद्यार्थ्यांना फायदा झाला असे, मुख्याध्यापक अशोक आहेर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन, करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश आगवन, उपाध्यक्ष बाबासाहेब आगवन, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे यांच्यासह शिक्षण प्रेमी सांडू भाई पठाण, बाळासाहेब भिंगारे, गणेश भिंगारे, रामदास भवर, लक्ष्मण भिंगारे, अविनाश भिंगारे, बळीराम थेटे, शिवाजी फापाळे, ज्ञानदेव आगवन, देविदास भिंगारे, अंबादास आगवन, नामदेव काळे, चांगदेव माळवे, बाळासाहेब कासार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच पात्र विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख विलास भांड अभिनंदन केले.