संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा आंतरराष्ट्रीय परीषदेत झेंडा- डॉ. मनाली कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या इ. ९ वी मधिल सहा विद्यार्थ्यांनी साई इंटरनॅशल स्कूल, भुवनेश्वरने (ओडिसा) ‘साईमुन’ या युनायटेड नेशन्स (यु.एन) च्या अधिपत्याखालील नोंदणीकृत कार्यक्रमांतर्गत आयोजीत केलेल्या ‘साईमुन कॉन्फरन्स २०२३’ या आंतरराष्ट्रीय परीषदेत सहभाग नोंदवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडवित संयुक्त राष्ट्रांनी उपस्थित केलेल्या, विविध मुद्यांवर सादरीकरण देवुन चमकदार कामगिरी केली.

आर्यन जालिंदर औताडेने विशेष पुरस्कारही प्राप्त केला, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

डॉ. कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, युनायटेड नेशन्स पुरस्कृत ‘मॉडेल युनायटेड नेशन्स’ ही परिषद दरवर्षी  विविध देशात घेतली जाते. विद्यार्थ्यांनी आजु-बाजुचे जग, समाज, वैविध्यपुर्ण संस्कृती, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, विविध समस्या व त्यांचे निराकरन, इत्यादीबाबी समजुन घेवुन भविष्याचा वेध घेत आत्मविश्वास बळावुन जागतिक शांतता व सुसंवाद वाढवुन आनंदी जगण्यासाठीचे मॉडेल युनायटेड नेशन्स हे एक खुले व्यासपीठ आहे.

भुवनेश्वर येथिल परीषदेत युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटीफिक अँड कल्चरल आर्गनायझेशन (यु.एन.ई.एस.सी.ओ) युनायटेड नेशन्स एन्वायरनमेंट प्रोग्राम (यु.एन.ई.पी), इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आय.सी.जे) आणि वर्ल्ड हेल्थ आर्गनायझेशन (डब्ल्युएचओ) अशा  मानव कल्याणासाठी कार्यरत असलेल्या, संस्थांशी निगडीत प्रश्न व त्यांचे निराकरना संदर्भात विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या परीषदेमध्ये युगांडा, श्रीलंका, केनिया, इथोपिया, सीरिया, माली, भारत, भुतान, सौदी अरेबिया, इस्वाटीनी अशा ११ देशातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

यामध्ये संजीवनी इंटरनॅशल स्कूलच्या जिया नरेश पारख, आर्यन जालिंदर औताडे, रायन टोनी, श्रृती भाऊराव गांगुर्डे, श्रेया प्रसाद अय्यर व स्वयंम राजेंद्र रोकडे या प्रतिभावंतांचा समावेश होता. यात वरील पैकी एक-एक संस्थेसाठी विद्यार्थ्यांच्या समित्या बनवुन सादरीकरणातुन विविध राष्ट्रांची भुमिका मांडण्यास सांगण्यात आले होते.

संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांचे कार्य व घडामोडींचे ज्ञान प्राप्त झाले. डब्ल्युएचओ या समितीमध्ये ८० मुत्सध्दी विद्यार्थ्यांमधून आर्यनने उल्लेखनिय कामगिरी करून विशेष पुरस्कार मिळविला.

या दरम्यान या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका जिज्ञासा कुलकर्णी यांनी कोणार्कचे सुर्य मंदिर व जगन्नाथ पुरी मंदिरांचेही दर्शन घेतले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व डॉ. कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन, प्राचार्या सुधा सुब्रमण्यम हेडमिस्ट्रेस माला मोरे व कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.