कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : आंतरराष्ट्रीय स्थरावर भारताचे नेतृत्व क्रीडा क्षेत्रातील खेळाडू प्रभावीपणे मांडतात. आजचे शालेय जीवनातील खेळाडू उद्याच्या बलशाली भारताचे आधारस्तंभ आहेत. त्यासाठी शालेय जीवनापासूनच योग्य कसरत करावी लागेल आणि हि कसरत “खेलो श्रीगणेश” च्या माध्यमातून होत आहे, असे मत अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी व्यक्त केले. ते श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूल जुनियर कॉलेज कोऱ्हाळे येथे घेण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
श्री गणेश शैक्षणिक संकुलात “खेलो श्रीगणेश”- श्री गणेश क्रीडा महोत्सवाच्या उद्घनाप्रसंगी जिल्हा क्रीडा शिक्षक अध्यक्ष सुनील गागरे, तालुका क्रीडा अध्यक्ष सुनील आहेर, श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ कामिनी शेटे, भारत शेटे, रविंद्र चौधरी, सुरेश गमे, देवीदास दळवी, महावीर शिंगवी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्नील लोढा, चिराग पटेल, आकाश छाजेड, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख, प्राचार्य रामनाथ पाचोरे, प्राचार्य पंकज खंडागळे, उपप्राचार्य प्रवीण दहे, सन्मयक प्रवीण चाफेकर, दिपक गव्हाणे, प्रियांका खरात, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. बापू पुणेकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
जग झपाट्याने बदलत चालले असून तंत्रज्ञानात देखील मोठा बदल झालेला आहे. बदलत्या काळानुसार मुले मोबाईलच्या विळख्यात सापडले असून हे विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे मुलांनी मोबाईलवर आपला वेळ न घालवत दररोज योगा करावा व्याधी मुक्त जीवन जगावे असे आवाहन जिल्हा क्रीडा शिक्षकअध्यक्ष सुनील गागरे यांनी केले. राहाता तालुका क्रीडा अध्यक्ष सुनील आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व समजावून, उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले.
क्रीडा ज्योत पेटवून “खेलो श्रीगणेश” चा प्रारंभ झाला. यावेळी पालकांनी व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात उत्स्फुर्त सहभाग नोंदवून आपला आनंद व्यक्त केला.”खेलो श्रीगणेश” हा उपक्रम एकूण २१ दिवसांचा उपक्रम असून वेगवेगळ्या गटातील विद्यार्थी खेळाचा आनंद घेणार आहेत. अशी माहिती प्राध्यापक विजय शेटे यांनी दिली. नियोजित कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक दिलीप दुशिंग, रवींद्र मोगल यांनी मोलाची भूमिका बजावली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. रुचिका चौधरी यांनी केले तर पाहुण्यांचे आभार प्रा. अभिलाषा कडू यांनी मानले.