कोरडा दुष्काळ जाहिर करण्यासाठी शेवगाव तहसिल कार्यालयावर मोर्चा

तहसिलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ : या परिसराला गेल्या तीन महिन्यापासुन पावसाने हुलकावणी दिली असल्यामुळे तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतक-या बरोबर जनावरावर उपासमारीची वेळ आली. याची दखल घेऊन तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहिर करावा यासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी (दि. २८ ) भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांचे नेतृत्वाखाली शेवगाव तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसिलदार प्रशांत सांगडे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात दुबार पेरणीसाठी एकरी १० हजार रूपये अनुदान द्या, पिक विम्याची रक्कम जाहिर करून ती रक्कम त्वरीत दयावी, उसाला ४ हजार रूपये टन भाव जाहिर करावा, शेत मजुर व शेतकरी यांना दरमहा किमान पाच हजार रूपये पेन्शन सुरू करा.

तसेच कांदा उत्पादक शेत-यांना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड नुकसान व मनस्थाप सहन करावा लागला म्हणून नुकसान भरपाई पोटी प्रति क्विंटल अडीच हजार रूपये अनुदान दयावे व नाफेडच्या जाचक अटी रद्द कराव्यात, ज्या शेतकऱ्यांचे मागील दोन वर्षांपासूनचे देणे राहिलेले अनुदान त्यांच्या बॅक खात्यावर त्वरीत वर्ग करावे. अशा स्वरुपाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच श्रीरामपुर तालुक्यातील हरेगाव येथील चार तरूणांना नागडे करून मारहाण करणाऱ्या समाज कंटकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पक्षाचे राज्य सचिव ॲड. कॉ. लांडे, कॉ. संजय नांगरे, कॉ. संदिप इथापे, कॉ. वैभव शिंदे, कॉ. भगवान गायकवाड, कॉ. ॲड भागचंद उकिर्डे, कॉ. दत्ता आरे, कॉ. बबनराव पवार, कॉ. बापुराव राशिनकर, कॉ. आत्माराम देवढे, सुभाष ढोरकुले आदी उपस्थित होते.