कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : मानवी जीवनात आरोग्य आणि स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी मैदानी कसरत व खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. कोपरगाव तालुका क्रीडा संकुल याच मूल्यांची जपवणूक करणारे केंद्र असून राष्ट्रीय क्रीडा दिन संकुलात साजरा करण्यात आला.
पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी बोलताना जाधव म्हणाले, आपल्या कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील तरुण आणि विद्यार्थी यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी खेळाला महत्व देणे आवश्यक आहे.
विविध साथीचे आजार, कोरोना सारखा संसर्ग आल्यानंतर मैदानी खेळाचे महत्व सर्वत्र कळून चुकले आहे. आरोग्य चांगले असणे ही सर्वात मोठी संपत्ती आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या. सर्वांसाठी मैदान हे सदृढ आरोग्याचा खजिना आहे. हा मूलमंत्र जपला तर मानसिक आणि शारीरिक ऊर्जा आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल.
माझा ग्रामीण भागातील विद्यार्थी हा स्पर्धात्मक युगात पुढे गेला पाहिजे यासाठी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर खेळाडूंना संधी आणि मार्ग निर्माण केले. त्याच दृष्टीने अनेक पिढ्या यशस्वी होण्यास तालुका क्रीडा संकुल हे पायाभरणी ठरले आहे.-पराग संधान
या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, सरपंच संदिप देवकर, दिनेश कोल्हे, विवेक खांडेकर, आकाश वडांगळे, दिगंबर बनकर, योगेश देशमुख, किरण राठोड, प्रशांत भास्कर, हर्षवर्धन सुराळकर, कृष्णा मालकर, संदीप संवत्सरकर, क्रीडा शिक्षक प्रा.पाटणकर आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी अनेक वर्षापूर्वी ही गोष्ट हेरून कोपरगाव तालुक्यासाठी क्रीडा संकुल प्राप्त करून त्याची उत्तम उभारणी केली. हजारो खेळाडू आणि नागरिक या संकुलाच्या माध्यमांतून आपले स्वास्थ्य जपण्यात यशस्वी होत आहेत. आगामी काळात मा.आ. स्नेहलता कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून मोठे भरीव काम खेळाडूंच्या भवितव्यासाठी होणार आहे असे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यावेळी म्हणाले.