अक्षय आव्हाड यास शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार प्रदान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : अहमदनगर जिल्हा बेसबाॅल असोशिएशनचा खेळाडू अक्षय मधुकर आव्हाड यास सन (२०२१-२२) बेसबॉल खेळातील महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच बालेवाडी क्रीडा संकुल पुणे या ठीकाणी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुंना राज्याचे राज्यपाल मा. रमेश बैस यांचे शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडवणीस व अजित पवार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोड, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन या प्रसंगी उपस्थित होते. 

यामध्ये कोपरगावचा भूमिपूत्र अक्षय आव्हाड यास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शालेय तसेच महाविदयालयीन जीवनात बेसबाॅल या खेळण्याची संधी व मार्गदर्शन अहमदनगर जिल्हा बेसबाॅलचे सचिव तसेच श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर व प्रा. सुनिल कुटे यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील  या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याबद्दल अक्षय आव्हाड याचे अहमदनगर जिल्हा बेसबाॅल असोशिएशन अध्यक्ष अरुण चंद्रे, राज्य बेसबाॅल संघटनेचे सचिव राजेंद्र इखणकर, खजिनदार अशोक सरोदे, जिल्हा सचिव मकरंद को-हाळकर, उपाध्यक्ष सुधिर चपळगावकर, तसेच कोपरगाव तालुका क्रिडा समितीच्या वतीने क्रिडा प्रेमी तर्फे अभिनंदन करण्यात आले.