कोपरगाव प्रतिनिधी दि.१२ : गवंडी काम करणाऱ्या एका मजुराने आपल्या मजुरीचे पैसे मागितल्याचा राग आला आणि चौघांनी मिळून गावातील भर चौकात खुन केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे घडली.
येसगाव येथील गवंडी काम करणारा मजुर दिपक दादा गांगुर्डे हा गावातील एकाकडे गवंडी काम केलेल्या श्रमाचे पैसे मागण्यासाठी सोमवारी बाजारच्या दिवशी गेला. गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात चौघांनी त्या मजुराला लाथा बुक्क्यांनी दगड आणि लाकडी दांड्याने मारहाण करुन हत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी तालुक्यातील येसगाव येथील भरवस्तीतील कमानीजवळ घडली.
यामध्ये मजुर दिपक दादा गांगुर्डे वय ४० वर्ष याला गंभीर दुखापती होवून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना कळवताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन गंभीर जखमी असलेल्या दिपक गांगुर्डे यास कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठवले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केले.
दरम्यान मयत दिपकची पत्नी जया गांगुर्डे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे पती दीपक दादा गांगुर्डे हे मजुरी ( गवंडी काम ) करीत असतात त्यांनी उषा सुनील पोळ, स्नेहा सुनील पोळ, राज उर्फ बबलू सुनील पोळ, अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड सर्व राहणार येसगाव यांच्याकडे गवंडी काम केलेल्या कामाची मजुरीचे पैसे मागण्यांसाठी गेले असता त्यांना त्याचा राग आला आणि माझ्या पतीला त्या चौघांनी शिवीगाळ करून लाकडी दांडके, लाथा बुक्क्याने दगडाने मारहाण मारहान केली.
तर आण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने पती दिपकच्या डोक्यात तसेच शरीरावर ठीक ठिकाणी मारहाण करून जबर जखमी करून खून केला. तसेच माझ्या भावाला शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की मारहान केली अशी तक्रार केली.
ज्या गांगुर्डे यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात आरोपी उषा सुनील पोळ, स्नेहा सुनील पोळ, राज उर्फ बबलू सुनील पोळ, आण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड सर्व राहणार येसगाव यांच्या विरोधात गु.र.न.४४१/२०२३ भा. द. वि. कलम ३०२, २२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना मंगळवार दिं १२ सप्टेबर रोजी न्यायालयात हजर केले असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करीत आहेत.