कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव तालुक्यासाठी एमआयडीसी सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असून, कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीसाठी मंजूर असलेल्या १४.६९ आर. जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी दाखल केलेला प्रस्ताव मंत्रालयात अंतिम टप्प्यात असून, लवकरच संस्थेस या जमिनीचा ताबा मिळेल. तसेच राजकारण बाजूला ठेवून उद्योजकांचे व औद्योगिक सहकारी वसाहतीचे हित जपण्याचे काम आम्ही करत आहोत, असे प्रतिपादन कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.
या सभेत युवा नेते विवेक कोल्हे यांना नवभारत ग्रुपचा ‘यंग प्रॉमिसिंग पॉलीटिशीयन ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत (इस्टेट) सोसायटी लि. च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत (इस्टेट) सोसायटी लि. ची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२७ सप्टेंबर) खेळीमेळीच्या वातावरणात झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेस संस्थेचे उपाध्यक्ष मुनिष ठोळे, संचालक मनोज अग्रवाल, अनिल सोनवणे, केशव भवर, पराग संधान, रवींद्र नरोडे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, पंडितराव भारूड, सुकृत शिंदे, रवींद्र आढाव, रोहित वाघ, ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई, शिमला जितेंद्रसिंग सारदा, प्रशांत होन, सोमनाथ निरगुडे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, जितेंद्रसिंग सारदा,
वसंतराव देशमुख, हाशमभाई पटेल, राजेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर वाकचौरे, संदीप वाणी, प्रभाकर होन, राजेंद्र रुपनर, जनार्दन वाके, सुनील पोरे, अभिजीत रहातेकर, अतुल काले सुनील तिवारी, निलेश वाके, योगेश रहाणे, प्रभाकर रेपाळे, अभिजीत जाधव, रवींद्र शिंदे, धीरज देवतरसे, सुधन चौधरी, विश्वनाथ भंडारे, मंगेश सरोदे, एकनाथ वाघ, अंकुश चव्हाण, ज्ञानेश्वर नाईकवाडे, संदीप उंडे, योगेश वाडेकर, नारायण वाडेकर, महेश खडामकर, कपिल गुंजाळ, व्यवस्थापक श्रीकांत लोखंडे आदींसह सभासद, उद्योजक व कर्मचारी उपस्थित होते.
विवेक कोल्हे यांनी आपल्या भाषणात कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटीचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून गेल्या पाच वर्षांत केलेल्या तसेच भविष्यात करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती दिली. ते म्हणाले, कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटीच्या स्थापनेस ६३ वर्षे पूर्ण झाली असून, सर्वांच्या सहकार्यामुळे औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योग आज सुस्थितीत चालू आहेत.
संस्थेची थकबाकी २५ ते २६ लाखांपर्यंत होती ती संचालक मंडळाने ४ ते ५ लाखांवर आणली आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मदतीने शासनाच्या ग्रामविकास निधीतून नवीन बहुउदेशीय सामाजिक सभागृह, आर.ओ. वॉटर प्लांट उभारण्याबरोबर सभासद कारखानदारांना रस्ते, वीज, पाणी, पथदिवे, ड्रेनेजलाईन आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
ते म्हणाले, उद्योग-व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी व वीज या तीन मूलभूत सुविधा उद्योजकांना प्राधान्याने पुरविण्यावर संचालक मंडळाने भर दिला आहे. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीत ५ एमव्हीए क्षमतेचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफार्मर बसवून अखंड वीजपुरवठ्याची सोय केली.
नवी पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था केली. वसाहतीमधील अंतर्गत रस्ते रुंद व मजबूत करण्यासाठी तसेच अंडरग्राउंड आरसीसी ड्रेनेजचा सुधारित १४ कोटी ५२ लाख १३ हजार ५०० रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. त्यात शासनाकडून ७५ टक्के म्हणजे १० कोटी ८९ लाख १० हजार १२५ रुपयांचा निधी मिळणार असून, २५ टक्के ३ कोटी ६३ लाख ३ हजार ३७५ रुपये संस्थेला एमआयडीसीकडे जमा करावयाचे आहेत. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी संस्थेने सरकारकडे २५:७५ या योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल केलेला आहे.
त्यात पहिल्या टप्प्यात संस्थेची योजना नं. २ मधील अंडरग्राउंड आरसीसी ड्रेनेजचे ४२ लाख ७९ हजार ४४५ रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. संस्थेने दुसऱ्या टप्प्यात वसाहतीत अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तसेच योजना नं. १ चा उर्वरित अंडरग्राउंड आरसीसी ड्रेनेज स्कीमचा १४ कोटी ५२ लाख १३ हजार ५०० रुपये खर्चाचा दाखल केलेला प्रस्ताव स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेला आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर उर्वरित सोयी-सुविधा पुरविण्यासाठी संस्था टप्प्या-टप्प्याने शासनाकडे प्रस्ताव सादर करणार आहे. संस्थेच्या थकबाकीदर सभासदांनी थकबाकी त्वरित भरून वसाहतीच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले..
प्रास्ताविक संचालक केशव भवर तर अहवाल वाचन व्यवस्थापक श्रीकांत लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन संचालक पंडितराव भारूड तर आभार प्रदर्शन रोहित वाघ यांनी केले. प्रारंभी मागील वार्षिक सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करण्यात आले. अहवाल वर्षात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या सन २०२२/२३ या आर्थिक वर्षाचा कामकाजाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, सन २०२३-२४ चे अंदाजपत्रक, लेखा परीक्षण अहवाल, शिल्लक नफ्याची वाटणी, सन २०२३-२४ चे अंदाजपत्रक आदी विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.