नवीन दहिफळ सरपंच पदी सविता शिंदे विजयी

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०६ : तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाच्या अशा नवीन दहिफळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सविता बाळासाहेब शिंदे यांची बहुमताने निवड झाली आहे. विद्यमान सरपंच लताबाई अप्पासाहेब बर्डे यांनी रोटेशन नुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी नवीन सरपंच निवडीसाठी अध्यासी अभिकारी तथा मंडल अधिकारी व्हीबी खेडकर यांचे अध्यक्षते खाली कामगार तलाठी फुंदे ग्रामसेवक गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

यावेळी सरपंच पदासाठी सविता शिंदे, मनिषा कुडलिक आर्ले व चंद्रकला बापूराव आर्ले अशा निधींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, चंद्रकला आर्ले यांनी अर्ज मागे घेतल्याने दूरंगी लढत झाली. त्यात सविता शिंदे यांना ४ तर मनिषा आर्ले यांना ३ मते मिळाल्याने शिंदे विजयी झाल्याचे खेडकर यांनी जाहीर केले.

नुतन सरपंच सविता शिंदे यांचा उपसरपंच कचरू इसराडे, सदस्य देविदास रणदिवे, गोकूळ व्यवहारे, आयुब शेख, आदिनाथ घनवट, अकबर शेख, सुनिल रणदिवे, संपत इसराडे आदिंच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.