कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : कोपरगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास करून जनतेचे आशीर्वाद मिळाले व मतदार संघातील अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास केल्यामुळे देवदेवतांचे आशीर्वाद मिळत आहे. त्यामुळे मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाबरोबर देवदेवतांचे आशीर्वाद देखील मिळत असून त्यामुळे आत्मिक समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील चांदेकसारे येथे ५० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या श्री भैरवनाथ मंदिर सभामंडप बांधणे कामाचे व ग्रामपंचायत अंतर्गत ५० लक्ष रुपये निधीतुन करण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघात अनेक तीर्थक्षेत्र असून असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अनेक देवस्थानांचा विकास रखडलेला असल्यामुळे भाविकांना आवश्यक सोयी सुविधा मिळत नव्हत्या. या तीर्थक्षेत्र आणि परिसराचा उत्तम रितीने विकास होऊन चांगल्या सोयी सुविधा मिळाव्या अशी असंख्य भाविकांची अपेक्षा होती. त्या मागणीची दखल घेवून मतदार संघातील श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती देवस्थान पोहेगाव, श्री. लक्ष्मीमाता मंदिर देवस्थान कोकमठाण, श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान ब्राम्हणगाव व श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान वारी या तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देत निधी देवून मतदार संघाच्या विकासाबरोबर तीर्थक्षेत्राच्या विकासाला चालना दिली.
तीर्थक्षेत्राचा विकास होवून भाविकांना त्या ठिकाणी उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळणार असल्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अजूनही अनेक देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देवून निधी देण्यासाठी प्रस्ताव शासन दरबारी पाठविलेले असून ते प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तीर्थक्षेत्राचा विकास करण्याबरोबरच नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी गावांतर्गत स्वच्छता देखील महत्वाची असून घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून हि समस्या सोडविली जावून अध्यात्म आणि आरोग्य यांची सांगड घालून मतदार संघाचा विकास साधावयाचा असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
या भूमिपूजन प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, रोहिदास होन, सरपंच किरण होन, उपसरपंच सचिन होन, नंदकिशोर औताडे, पाराजी होन, भिवराव दहे, नारायण होन, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक वीरेंद्र शिंदे, ह.भ.प.मनसुख महाराज दहे, मतीन शेख, विलास चव्हाण, सुधाकर होन, अरुण खरात, रविंद्र खरात, किरण होन, बशीर शेख, शरद होन, कर्णा चव्हाण, वसीम शेख, जयद्रथ होन, मोहन गुजर, युनूस शेख, अस्ताफ शेख, अशोक होन, मनोज होन, मलू होन, मनोहर होन, आण्णा नन्नवरे,
कल्याण होन, मोहम्मद शेख, सतिश खरात, दादाभाऊ होन, सुनील होन, किशोर झगडे, अर्जुन बोरावके, रामदास जाधव, बाळासाहेब खंडिझोड, भाऊसाहेब होन, नितीन होन, नुरमहंमद शेख, माऊली पवार, पंकज होन, निलेश होन, अनिल होन, केशव होन, हसन सय्यद, मनराज होन, किशोर होन, सीताराम गुरसळ, हिरामण त्रिभुवन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, ग्रामसेवक बी.डी. नाडेकर, ठेकेदार वदक, कोल्हे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.