कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री गणेश शिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. यातील एकूण २१ विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
यामध्ये १४ वर्षे वयोगटात गोळा फेक प्रकारात श्रद्धा चव्हाण प्रथम क्रमांक, साखळी धावणे गटात श्रद्धा चव्हाण, अस्मिता चांगले, रेणुका डांगे, आरोही डांगे यांचा द्वितीय क्रमांक आला. तर लांब उडी प्रकारात श्रद्धा चव्हाण आणि १०० मी धावणे प्रकारात साईशा चौधरी यांचा तृतीय क्रमांक आला.
१७ वर्षे वयोगटात डिस्क फेकणे व भाला फेक प्रकारात साई उदावंत याचा प्रथम क्रमांक आला. १०० मीटर धावणे प्रकारात साक्षी शिंदे हिचा प्रथम क्रमांक, तर ४०० मीटर धावणे साखळी प्रकारात साई खाकाळे, ईश्वर डांगे, हर्षद गवांदे, स्तवन साळवे यांचा तृतीय क्रमांक आला. १९ वर्षे वयोगटात उंच उडी प्रकारात शंकर यादव व लांब उडी प्रकारात अंकिता आढाव यांचा प्रथम क्रमांक आला.
१०० मीटर धावणे प्रकारात अदिती डांगे, २०० मीटर धावणे प्रकारात शुभम आंब्रे, उंच उडी प्रकारात जयेश चव्हाण, ऋतुजा गमे, लांब उडी प्रकारात स्वाती हांडोरे यांचा द्वितीय क्रमांक आला. तसेच मुलांमध्ये १०० मीटर धावणे साखळी प्रकारात धनंजय चोळके, शंकर यादव, हेमराज भुसारे, जय गोंदकर तर मुलींमध्ये सेजल अहिरे, ऋतुजा जाधव, पूजा गव्हाणे, अदिती डांगे यांचा द्वितीय क्रमांक आला.
उंच उडी प्रकारात साईशा चौधरी ४०० मीटर धावणे साखळी प्रकारात जय गोंदकर, यश ढोकणे, शुभम डोळस, साई खाकाळे यांचा तृतिय क्रमांक आला. स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक घेऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय जनार्दन शेटे यांनी दिली.
सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल, गणेश कुऱ्हाडे, देविदास दळवी, प्राचार्य रियाज शेख, रामनाथ पाचोरे, पंकज खंडांगळे, प्रवीण चाफेकर, दिपक गव्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. बापू पुणेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक दिलीप दुशिंग व रवींद्र मोगल यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.