कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : कोपरगावचा पैसा कोपरगावात राहून कोपरगावच्या बाजार पेठेला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी स्वत: पत्नी समवेत कोपरगावच्या बाजार पेठेत खरेदी करून ग्राहकांना माफक दर, चांगली सेवा व ग्राहकांसाठी बक्षिसाच्या योजना राबविण्याचे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी व्यापारी बांधवांना केले होते.
काळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून व्यापारी महासंघाने संपूर्ण कोपरगाव तालुक्यातील ग्राहकांसाठी आकर्षक योजना व बक्षिसे ठेवली असून व्यापारी महासंघाकडून प्रत्येक दुकानात खरेदीवर लकी ड्रॉ कुपन ठेवण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभ नुकताच आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आला असून या निमित्ताने आमदार काळेंच्या पुढाकारातून बाजार पेठ फुलण्यास मदत होवून ग्राहकांना बक्षिसे जिंकण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव शहराच्या बाजारपेठेची व्यवसाय वृद्धी होवून कोपरगावच्या बाजार पेठेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी आमदार काळे यांनी शहराचा सर्वात महत्वाचा पाणी प्रश्न मार्गी लावला आहे. शहराच्या रस्त्यांची असलेली अडचण दूर करताना रस्त्यांसाठी दिलेल्या कोट्यावधी निधीतून शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांचा प्रश्न सुटला आहे. कोपरगावची बाजार पेठ पुन्हा फुलावी यासाठी आमदार काळे यांनी स्वत: पत्नी चैताली काळे यांच्या समवेत कोपरगावात खरेदी करून स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करावी असा संदेश देवून नागरिकांना देखील स्थानिक बाजारपेठेत खरेदीचे आवाहन केले आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या विविध योजना राबवून या कंपन्या ग्राहकांना घरबसल्या पाहिजे ती वस्तू देवून मोठा व्यवसाय करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी देखील बदलत्या व्यावसायिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी बदल स्वीकारून माफक दर, चांगल्या सुविधा व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बक्षीस योजना ठेवण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी महासंघाने आमदार काळेंच्या आवाहानाला प्रतिसाद देवून ग्राहकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली आहेत. यामध्ये टीव्ही, फ्रीज, दुचाकी सह लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे असून संपूर्ण तालुक्यासाठी हि विक्री वृद्धी योजना राबविण्यात येणार आहे.
सध्या ऑनलाईन खरेदीकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून नागरिकांनी बाहेर पडावे. सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदीतून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपले नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी व्यापारी महासंघाने राबविलेल्या बक्षीस योजनांचा लाभ घेवून खरेदी करावी. कोपरगावच्या बाजार पेठेला पुन्हा फुलविण्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी कोपरगावच्या व्यापार समृद्धीसाठी एक पाऊल उचलले त्याला व्यापारी महासंघाने प्रतिसाद दिला त्याप्रमाणे ग्राहकांनी देखील प्रतिसाद द्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीर डागा, राजेंद्र बंब, तुलसीदास खुबानी, गुलशन होडे, प्रदीप साखरे, सचिन ठोळे, अजित लोहाडे,महावीर सोनी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गगुले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, बाळासाहेब रुईकर, शैलेश साबळे, चंद्रशेखर म्हस्के, आकाश डागा आदी उपस्थित होते.