शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : शेवगाव आगाराची एसटी बस (क्र. एमएच ०७, सीएच ९२४७) ही पैठण येथून शेवगावच्या दिशेने येत होती. बस शेवगाव पोलिस ठाण्याजवळ येताच अचानक पाईप फुटल्याने तिचा ब्रेक फेल झाला. मात्र प्रसंगावधान राखत चालक महादेव बुधवंत यांनी वेळीच खबरदारी घेत बस आगारात घातली.
ब्रेक फेल झाल्याचे समजताच शेवगाव आगारात असलेल्या प्रवशांसह कर्मचार्यांची एकच धांदल उडाली. मात्र, चालक महादेव बुधवंत यांनी मोठ्या हुशारीने छोट्या टेकडीवर बस घालून ती थांबवत प्रवाशांचे प्राण वाचवले. या बसमध्ये चालक, वाहकांसह १० शालेय विद्यार्थी व १० लोक असे २० प्रवाशी होते. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान घडली.