तीन हजार कोटी काळेंनी आणले, मग कामं का दिसत नाहीत? – बिपीन कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी दि.१: कोपरगाव तालुका पाण्यावाचून होरपळाला, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा पाण्याची कमतरता, हक्काचे पाणी नाही, राज्यातील ४० तालुके सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर केले, पण कोपरगाव तालुक्याचा त्यात सामावेश नसल्याने या तालुक्याचे लोकप्रतिनिधी मुंबईला जावून काय करतात? का फक्त लाडू खायला जातात का? असा सवाल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला.

बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, या मतदार संघाच्या लोकप्रतिनिधी तालुक्यासाठी तीन हजार कोटी विकास निधी आणल्याचे सांगतात. जर तीन हजार कोटींचा निधी खरोखर आणला असता तर तालुक्याचा पाणी प्रश्न केवळ तीनशे कोटीत संपला असता. स्व कोल्हेंनी संपूर्ण आयुष्य पाण्यासाठी घालवलं. म्हणुन आपल्याला पाण्याची झळ पोहचली नाही. जर कोल्हेंनी धरणाचे कामं करून घेतले. या कामासाठी इतर कोणीही प्रयत्न केले नाहीत.

गेल्या चार वर्षांपासून तालुक्याला पिक विमा मिळाला नाही. लोकप्रतिनिधी विकास कामांचे फक्त फ्लेक्स लावुन जनतेची फसवणुक चालु केली आहे, अशा फसवेगिरी पासुन सावध राहिले पाहिजे. तळ्यातच नाही तर मळ्यात कुठून येणार अशी स्थिती झाली आहे असे म्हणत आमदार आशुतोष काळे यांच्यावर थेट निशाण साधला.