संजीवनी अकॅडमीमध्ये लोकशाही पध्दतीने विद्यार्थी समितीची निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०८ : देशाच्या प्रगतीमध्ये लोकशाही मुल्यांना अनन्य साधारण महत्व आहे. त्या मुल्यांची रूजवण शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर झाल्यास, उद्याचे सुज्ञ मतदार तयार होवुन लोकशाही पध्दतीला बळकटी येवुन देश प्रगतीच्या मार्गावर आहेच, परंतु अधिकची गतिमानता येईल.

या अनुषंगाने संजीवनी अकॅडमीने शैक्षणिक वर्ष २०२३- २४ साठी लोकशाही पध्दतीचा अवलंब करीत मतदान करून विद्यार्थी समिती निवडून बालवयातच लोकशाही मुल्यांची रूजवण महत्वाची असते, या विचार धारेला महत्व दिले, असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्याच्या निवासी नायब तहसिलदार प्रफुल्लीता सातपुते यांनी केले.  

संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांचे संकल्पनेनुसार शैक्षणिक वर्ष २०२३- २४ साठी शालेय कामकाज चालविण्यासाठी लोकशाही पध्दतीने ३० विध्यार्थ्यांचेे जम्बो विद्यार्थी परिषद मंडळ निवडण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपुर्वक आमंत्रित करून त्यांना प्राचार्या शैला झुंजारराव यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन सातपुते बोलत होत्या. या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी भूषविले. यावेळी प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन, उपप्राचार्या प्रिती राय, हेड मिस्ट्रेस रेखा साळुंके, सर्व शिक्षक वृंद व विध्यार्थी उपस्थित होते. सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या निवडणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी (स्कूल कॅप्टन) म्हणुन आदिती जोरी हीची निवड झाली. तर उपविद्यार्थिनी प्रतिनिधी (व्हाईस कॅप्टन) म्हणून नवी दुबे व निशिगंधा वाबळे यांची निवड झाली. शैक्षणिक कामकाज सांभाळण्यासाठी प्रिशा बजाज, सांस्कृतिक विभाग सांभाळण्यासाठी नेहा गुरळी, क्रीडा विभाग सांभाळण्यासाठी स्पंदन जाधव याची निवड झाली आहे.

संपुर्ण शैक्षणिक वर्षात शिस्तीचे पालन करून घेण्यासाठी कृष्णा गायकवाड व श्रेयन भोर यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करून त्या गटांमार्फत विविध ऊपक्रम राबविवण्यात येतात.

या गटांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या गड किल्यांची नावे देण्यात आली आहेत. यात प्रतापगड गटाचे कॅप्टन म्हणुन आदित्य भामरे व कार्तिक भागडे यांची निवड झाली आहे. तोरणागड गटासाठी अवधुत गायकवाड व भक्ती परजणे, रायगड गटासाठी देवाश्री दोडिया व शिवराज देशमुख, सिंहगड गटासाठी आदित्य गाडे व इशिका मालकर यांची निवड झाली आहे.

यावेळी डॉ. कोल्हे म्हणाल्या की या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा संपन्नता आहेच. आता त्यांच्याकडे नेतृत्व येवुन त्यांच्या हातुन भविष्यात ते मोठे झाल्यावर मातृत्वही अंगिकारले जाईल. विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे यश म्हणजे माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांनी सर्वगुण संपन्न पिढीचे पाहीलेल्या स्वप्नांना, संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे मार्फत मिळत असलेल्या बळकटीचे प्रतिबिंब आहे. सर्व निवडणुक प्रक्रिया स्कूलच्या क्रीडा विभागाने राबविली.