कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०६ : कोपरगाव मतदारसंघाच्या २१ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सरपंच संख्येने काळे गट पुढे दिसत असला तरी सदस्य संख्येत मात्र, कोल्हे, काळे यांना समान कौल मिळाल्याचे चित्र आहे. कोल्हे गटाकडे ८ ग्रामपंचायतमध्ये सदस्य संख्येत वर्चस्व आहे तर काळे गटाकडे १०, औताडे कोल्हे युती १, अपक्ष १, स्थानिक आघाडी १ (कोल्हे जवरे) असे बलाबल झाले असून काही ग्रामपंचायत या अल्पशा फरकाने सदस्य कमी अधिक झाल्याने गणिते काय होणार याकडे आगामी काळात लक्ष लागून असेल.
ब्राम्हणगाव, बोलकी, धोत्रे, मुर्शतपूर, पुणतांबा, वाकडी, चितळी, पोहेगाव, जवळके, लौकी, चांदगव्हाण आदी ठिकाणी काळे गटाचे सदस्य संख्या कमी असून बहुमताच्या दृष्टीने कोल्हे आणि इतरांचे वर्चस्व राहिले आहे. तर सुरेगाव, कारवाडी, मंजूर, दहेगाव, वारी, कान्हेगाव, घोयेगाव, शहाजापुर आदी ठिकाणी काळे गटाचे सदस्य संख्या बहुमता जवळ आहे. कुंभारीत अपक्ष पॅनल सत्तेत आला आहे.
मतदारसंघाच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुणतांबा, वाकडी, चितळी, ब्राम्हणगाव या ग्रामपंचायत कोल्हे गटाकडे गेल्या असून बहुसंख्य मतदार असणारी मोठ्या गावाचे सरपंच कोल्हे गटाचे असून संख्यात्मक दृष्ट्या हे उल्लेखनीय आहे.
एकंदरीत कोल्हे आणि काळे यांच्या सदस्य बहुमताच्या जोरावर होणारे वर्चस्व समसमान झाले असून चुरशीच्या असणाऱ्या स्थानिक निवडणुका या अनेक लहान प्रश्नावर आणि समस्यांवर येऊन ठेपत असतात. मोठ्या मतदारसंख्या असणारी गावे ही कोल्हे गटाला अनुकल ठरली तर कमी मतदारसंख्या असणाऱ्या गावात काळे गटाला संख्या वाढविण्यात यश आल्याचे समिश्र चित्र निर्माण झाले आहे.
कोपरगाव मतदारसंघाच्या दृष्टीने युवानेते विवेक कोल्हे यांच्या करिष्म्याची जादू राहता तालुक्यातील निवडणुकीत देखील दिसून आली. राहता तालुक्यातील कोपरगाव मतदारसंघाला जोडलेल्या गावांपैकी तीन प्रमुख मोठी गावे कोल्हे गटाने एकतर्फी विजय खेचून आणून आपली एकहाती सत्ता आणून ताकद सिद्ध केली आहे.