आशुतोष काळेंची कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महत्वपूर्ण मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात अतिशय कमी पर्जन्यमान झाले असून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे जायकवाडी धरणात या वर्षी पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्याबाबतचा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करून शासनास सादर करावा अशी महत्वपूर्ण मागणी आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली.

त्याबाबतचे निवेदन पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांना दिले असून हा ठराव राज्य शासनाकडे तात्काळ पाठवला जाणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक गुरुवार (दि.१६) रोजी पार पडली.

यावेळी आ. आशुतोष काळे यांनी लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या पालक मंत्र्यांपुढे मांडल्या. ते म्हणाले की, गोदावरी कालव्याचे आवर्तन सुरू असतांना पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर पाणी उपलब्ध होत नाही. याचा प्रत्यय खरीप हंगामात आला असून त्याची रब्बी हंगामात पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. आवर्तन काळात विस्कळीतपणा येणार नाही व शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.

त्यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली. त्या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवर्तनाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बीचे २ आवर्तन देण्याचे जाहीर करण्यात आले असले तरी दुष्काळी परिस्थिती पाहता व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा विचार करून उन्हाळी आवर्तन देण्यासाठी देखील नियोजन करावे अशी आग्रही मागणी केली.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याबाबतचा ठराव मंजूर करून शासनास सादर करावा याबाबत पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांना निवेदन देतांना आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर व शेतकरी

त्याबाबत पालकमंत्र्यांनी व पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून शासनाला दरवर्षी जवळपास १० कोटीचा महसूल मिळतो. मात्र, त्या बदल्यात चाऱ्या दुरुस्तीसाठी अतिशय कमी निधी मिळत असल्यामुळे चाऱ्यांची पूर्णत: दुरुस्ती होत नसून सिंचनाच्या वेळी पूर्ण क्षमतेने सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा.

गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यावरील चाऱ्या दुरुस्तीसाठीचा नियोजित आराखडा तातडीने मंजूर करून व दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केली. यावेळी गौतम बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, संचालक दिलीप बोरनारे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, राहुल रोहमारे, वसंत आभाळे, माजी संचालक पद्माकांत कुदळे, कारभारी आगवण, ज्ञानदेव मांजरे, सुनील शिंदे, हरिभाऊ शिंदे, अशोकराव काळे, एम.टी. रोहमारे, आनंदराव चव्हाण, 

बाळासाहेब बारहाते, अरुणर चंद्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी, राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष चारुदत्त सिनगर, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, रोहिदास होन, राजेंद्र खिलारी, तुषार विध्वंस,सोपान वाघ, बाबासाहेब वाघ, संजय वाघ, हरिहर वाघ, रुपेश गायकवाड, दीपक वाघ, बाळासाहेब वाघ, जालिंदर वाघ, गजानन मते, संतोष वर्पे, सुनील वर्पे, संपतराव खालकर, रवींद्र वर्पे, बाळासाहेब खालकर, गजानन गांगवे, ज्ञानेश्वर गव्हाणे, भास्कर गव्हाणे, रंगनाथ गव्हाणे, विजय कोटकर, ज्ञानदेव गव्हाणे, 

अमोल पाडेकर, नानासाहेब शेंडगे, प्रमोद गोसावी, विजय गोर्डे, अरुण कोल्हे, बाबासाहेब रहाणे, गोपीनाथ रहाणे, रामनाथ पाडेकर,साहेबराव रहाणे, पुंजाहारी रहाणे, नंदू पाडेकर, भाऊसाहेब रहाणे, अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, गोदावरी डावा कालवा सहाय्यक अभियंता निकम, उजवा कालवा सहाय्यक अभियंता महेश गायकवाड, शाखाधिकारी ससाणे, निवृत्त उपअभियंता तात्याराव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.