चर्मकार महासंघाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : शेवगाव तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखेच्या वतीने येथील महात्मा वाचनालयात तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य म्हणून निवडून आलेल्या चर्मकार समाज बांधवाचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी महणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक राजेंद्र बुंदेले उपस्थित होते.

याप्रसंगी ते म्हणाले, जेव्हा समाज शिक्षित होतो, तेव्हा सामाजिक कार्यासोबत राजकीय क्षेत्रात देखील त्याचे कार्य दिसून येते आणि संविधानिक एखादे पद त्याला मिळणे म्हणजे ही त्याच्या कामाची पावती असते. आज पसतीस, छत्तीस, ग्रामपंचायतीमधून पंधरा, सोळा सदस्य हे चर्मकार समाजाचे असणे म्हणजेच चर्मकार समाजाचा अभिमान आणि त्या त्या गावातील लोकांनी चर्मकार समाजावर दाखवलेला विश्वास आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती दिसून येत असून भविष्यात लोकसभा आणि विधानसभा मध्ये चर्मकार समाजाचे बहुमत राहील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सद्गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नवनिर्वाचित सरपंच तथा सदस्य सन्माननीय, लक्ष्मण टाचतोडे (शिंगोरी), दादासाहेब भानुदास गाडेकर (वडुले खुर्द), किशोर भारत कवडे (आव्हाने बु), कानिफनाथ अशोक तेलोरे (खरडगाव), भानुदास लक्ष्मण नन्नवरे (खरडगाव), विलास विष्णू शिंदे (वडूले बु), मथुरा सिताराम बोरुडे (शहर टाकळी) यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.     

याप्रसंगी शासनातर्फे पीच परवाना, स्टॉलचे वाटप आणि महामंडळाकडून मिळणाऱ्या कर्ज, घरकुल आणि विविध सवलतीबाबत तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्याबाबत नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष उदमले यांनी सविस्तर माहिती दिली. शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ कवडे, कार्याध्यक्ष भाऊराव कांबळे उपाध्यक्ष दादासाहेब पाचरणे, सचिव हनवते, युवक अध्यक्ष महेश शेवाळे,  शुभम बनस्वाल आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

देवमन बांगरे, तुषार बनस्वाल, मुकुंद वाघमारे, योगेश हनवते, डॉ. किशोर जाधव, डॉ. दिलीप जाधव, हितेश परदेशी, संजय तेलोरे , संजय परदेशी, मनोज बन्सवाल, किरण जाधव, सचिन चव्हाण, आदी चर्मकार समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.