कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : रवंदे ग्रामपंचायतने उभारलेल्या शिवपार्वती व्यापारी संकुलाचे उद्घाटन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि.२२/१२/२०२३ रोजी करण्यात आले. या प्रसंगी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की, रवंदे ग्रामपंचायत नेहमीच विकासाच्या पातळीवर गतिमान कामे करण्यात अग्रेसर आहे.
नूतन व्यापारी संकुल हे बाजारपेठेची चालना ठरेल. काही काळातच जवळपास १६ कोटींचे कामे करने हे कौतुकास्पद आहे. विविध स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करताना सरपंच कै.भानुदास भवर यांचे स्मरण या निमित्ताने केले गेले. रस्ते, वीज, पाणी आणि गटारी या मूलभूत सुविधा पूर्ण होऊन वेगवेगळ्या माध्यमातून गावच्या विकासाचा गाडा ओढला जाणे हे बदलत्या काळाची गरज आहे. शेतीला आपण व्यवसाय म्हणून बघणे आवश्यक आहे.
संजीवनी उद्योग समूहाने नेहमी काळाची पावले ओळखत विविध शेती निगडित प्रकल्पांची सुरूवात केली. बांबूची शेती अनेक वर्ष उत्पन्न देणारी आहे. एक संस्था स्थापन करून ५०० एकर बांबू लागवड करून निःशुल्क पद्धतिने शासन स्तरावरून योजना राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आगामी काळात प्रतिनिधी आपल्याशी देखील संपर्क करतील त्यात सर्व शेतकरी बांधवांनी मोठा प्रतिसाद द्यावा कारण बांबू शेती अंतर्गत पिके देखील घेता येतात.
दुग्ध व्यवसाय हा शेती जोडधंदा ग्रामीण अर्थकारणाला आधार आहे. रवंदे हे प्रगतिशील शेतकरी असणारे गाव आहे. अनेक भविष्यकालीन बदल साकारून नैसर्गिक असमतोलाला सामोरे जाण्यासाठी योग्य पावले टाकली जात आहेत. स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी नेहमी समस्येच्या तळाशी जाऊन काम करण्याची शिकवण दिली आहे. गमतीने स्व.कोल्हे साहेब म्हणत असत की, वाळवंटात कारखाना टाकला तरी मी तो चालवून दाखवू शकतो इतका आत्मविश्वास त्यांना होता.
दूरदृष्टीने राबविलेले उपक्रम आणि कार्य हे दीर्घकाळ टिकते. नवीन व्यवसायिक आणि तरुण पिढी यांना भविष्यात अनेक संधी आर्थिक उन्नतीच्या आहेत. आपला व्यवसाय हा काळासोबत गतिमान होण्यासाठी शेती ते उद्योगपती हा प्रवास शक्य आहे. रवंदे गावच्या विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आगामी काळात नावीन्यपूर्ण उपक्रमात सहकार्याची भावना विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी कोल्हे कारखाना उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक निलेश देवकर, संचालक निवृत्ती बनकर, मा.संचालक साहेब कदम, संचालक विलास जगझाप, मा.संचालक अशोक भाकरे, कोसाका माजी संचालक अशोक काळे, जयराम गडाख, धोंडीबा सांगळे, माजी सभापती सुनील देवकर, श्रीकांत चांदगुडे, राहुल वाणी, माजी सभापती विजय साळुंके, सुभाष दवंगे, आकाश वाजे, साहेबराव लामखडे, बाबासाहेब कंक्राळे, शांताराम कदम, केशव कंक्राळे, श्री.निमसे, निवृत्ती सोनवणे, राधाकिसन कंक्राळे, दीपक कदम, शिवाजी कदम, भाऊसाहेब कदम, शेख साहेब,
अंबादास कदम, मच्छिंद्र लामखडे, उत्तम कदम, बाबासाहेब कदम, पोपट भुसे, अनिल सांगळे, सुधाकर चंद्रे, उमेश कदम, उपसरपंच संदीप कदम, शोभा कंक्राळे, ऋषिकेश कदम, मंगल सोनवणे, लता सोनवणे, रेखा कदम, शोभा भवर, कांता मढवई, सरिता पवार, राहुल घायतडकर, उत्तम भुसे, प्रल्हाद वाघ, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बागले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.