कोपगाव प्रतिनिधी, दि.२४ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवसंजीवनी देणारी तसेच लातूर व कोटा यासारख्या ठिकाणी न जाता शिर्डी व परिसरातच उच्च असे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण करून अमूल्य रत्ने, हिरे व मोती श्री गणेश शिक्षण संस्था तयार करत आहे. विद्यार्थ्याने ध्येय निश्चित करून, जिद्दी बनवून आपले ध्येय गाठण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. असे मत शिर्डी अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी व्यक्त केले. श्रीगणेश संकुलात “महाराष्ट्र माझा” या तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राहाता सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, कोऱ्हाळे सरपंच पूजा झिंजुर्डे, उद्योजक रवी नेवगे, दिलीप सदाफळ, पालक बंडू दुशिंग, श्री गणेश संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमीचंद लोढा, विश्वस्त कामिनी शेटे, भारत शेटे, रवींद्र चौधरी, सुरेश गमे, देविदास दळवी, महावीर शिंगवी, संदीप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मूनावत, स्वप्निल लोढा, चिराग पटेल, आकाश छाजेड, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख, प्राचार्य रामनाथ पाचोरे, प्राचार्य पंकज खडांगळे, समन्वयक दिपक गव्हाणे, सरीता शिरोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी बापू पुणेकर आदि उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर कमी प्रमाणात करणे गरजेचे आहे. पालक, विद्यार्थी व शिक्षक यांचा त्रिकोण श्री गणेश शैक्षणिक संकुलात उत्तमरीत्या साधला जातो. असे मत राहाता सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी व्यक्त केले. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रा.विजय शेटे यांनी ज्ञानाची शिदोरी उपलब्ध करून दिली आहे. असे मत सरपंच पूजा झिंजुर्डे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. योगेश फटांगरे, प्रा.सागर हिंगे, प्रा.सुनील गोर्डे, प्रा.साहिल सय्यद, प्रा.अमोल कोतकर, प्रा.नंदलाल आहेर, प्रा.गौरव लहामगे, प्रा.ऋषिकेश आंत्रे यांनी परिश्रम घेतले. श्रीगणेश शैक्षणिक संकुलात एकूण ५० गुणवंत विद्यार्थिनींना दत्तक घेऊन महिलांचे सबलीकरण करणे, समानतेचा दर्जा राखणे व आदर्श व्यक्तिमत्व घडविणे हे संकुलाचे एक धोरणच आहे.