उसतोडणी महिला कामगारांसाठी आरोग्य समुपदेशन शिबीर संपन्न

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ :  तालुक्यातील शिंगणापुर परिसरातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील उसतोडणी महिला कामगारांचे आरोग्य समुपदेशन शिबीर शनिवारी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संचालिकासोनिया बाळासाहेब पानगव्हाणे होत्या. 

           प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, उसतोडणीच्या निमीत्ताने असंख्य कामगारांचे गळीत हंगाम काळात स्थलांतर होत असते. त्यात महिलावर्गाचे आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते मात्र सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक, कोल्हे  तसेच माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या शिकवणुकीतुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे सातत्याने आपल्या कुटूंबातील घटक या नात्यांने श्रमीक वर्गाकडे लक्ष देवुन त्यातील कमतरता कारखाना व्यवस्थापनाच्या माध्यमातुन दुर करण्यांचा प्रयत्न करतात असे ते म्हणाले.

           टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. आसेफा पठाण महिला उस तोडणी कामगारांचे समुपदेशन करतांना म्हणाल्या की, महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. सकस आहार कमतरता, यामुळे त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण असंतुलीत राहते. गरोदर महिलांनी नियमीत सकस आहार कसा घ्यावा, ठरावीक महिन्यातील लसीकरण काळजीपुर्वक घ्यावे, आरोग्याच्या काही तक्रारी उदभवल्यास त्यांनी शेजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अगर ग्रामिण रूग्णालयातील वैद्यकिय अधिक-यांशी संपर्क साधुन आवश्यक ते उपचार घ्यावे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन उसतोडणी मजुरांची नियीमत आरोग्य तपासणी व त्यांच्यासंदर्भातील विविध उपक्रम राबविण्यांत नेहमीच पुढाकार घेत असते. शासनामार्फत उसतोडणी कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांविषयी उस व्यवस्थापक जी.बी. शिंदे यांनी माहिती देत गळीत हंगाम काळात सदैव सतर्क राहुन उसतोडणी कामगारांची काळजी घेतली जाते असे सांगितले. आरोग्य सहाय्यक एस बी. कचरे यांनी उपस्थित महिलांना लोहयुक्त गोळयांसह अन्य औषधांचे वाटप केले. सुत्रसंचलन व आभार डॉ. मनोज बत्रा यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी उपशेतकी अधिकारी सी. एन. वल्टे व त्यांच्या सहका-यांनी विशेष परिश्रम घेतले.