शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ : लोकनेते स्व. मारूतराव घुले यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आयुष्यभर समर्पित भावनेतुन काम केले. त्यांच्याच शिकवणुकीनुसार तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल सुरू असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करणाऱ्या बाजार समितीच्या कामकाजाचा लौकिक सर्वदूर पोहोचला आहे. यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी दिल. तालुका कृ. उ. बाजार समितीच्या प्रांगणात नव्याने बसविलेल्या ८० टन क्षमतेच्या भुईकाच्याचे लोकार्पण शुक्रवारी माजी आमदार घुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी घुले यांचे हस्ते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती झालेल्या नदकुमार मुंडे यांचा सन्मान करण्यात आला. बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक करून समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयाची माहिती दिली.
ज्येष्ठ नेते अरुण लांडे, उपसभापती गणेश खंबरे, राजेंद्र दौंड, हनुमान पातकळ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर मुंडे, अशोक ध, राहुल बेडके, मनोज तिवारी, प्रदीप काळे, माजी सभापती अनिल मडके, बबन मडके, अशोक मेरङ, जमीर पटेल, जाकीर कुरेशी, राम अंधारे, किसन कातकडे, भुसार व्यापारी भगवान धुत, कैलास देहाङराय, सचिव अविनाश म्हस्के, सहसचिव मुदतसर शेख, आर.बी राजपुरे उपस्थित होते. सचिव मस्के यांनी सूत्रसंचालन केले. हनुमान पातकळ यांनी आभार मानले.