समाजोपयोगी उपक्रम राबविल्याने समाजसेवा केल्याचे समाधान मिळते – स्नेहलता कोल्हे

कै.एकनाथ घुले यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त सर्व रोगनिदान शिबीराचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०४ : कुंभारी येथील कै.एकनाथ माधव घुले यांचे सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. कै.एकनाथ याचे कुटुंबीय त्यांचा वारसा पुढे चालवत असून, माजी सरपंच प्रशांत घुले यांनी त्यांचे वडील कै.एकनाथ घुले यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त मोफत सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करून एक चांगला उपक्रम राबविला आहे. असे समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमातून समाजसेवा केल्याचे खरे समाधान मिळते, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने कै. एकनाथ माधव घुले यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त बुधवारी (३ जानेवारी) मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास स्नेहलता कोल्हे यांनी भेट देऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. कुंभारी येथील श्री राघवेश्वर मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिराचे उदघाटन प. पू. १०८ राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजी घुले, कुंभारी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत घुले, लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच देवयानी घुले, उपसरपंच दिलीप ठाणगे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, विस्तार अधिकारी प्रशांत तोरणे, ग्रामसेवक कहार, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर शेळके, ग्रामपंचायत सदस्य ललित नीळकंठ, राहुल पवार, देवकर, गीताराम ठाणगे, शिवाजी कदम, चंद्रभान बढे, अर्जुन घुले, सुभाष घुले, मधुकर वाहडणे, पंढरीनाथ घुले, वाल्मीक कदम, विजय कारभारी, कदम, सुभाष बढे, श्रीराम घुले,

नारायण घुले, भीमराज घुले, भाऊसाहेब घुले, रमण घुले, अशोक कदम, नारायण ठाणगे, श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वाल्मिक नीळकंठ, सचिव श्रीकांत पैठणी, डॉ.विजय गोडगे, जयवंत बढे, अतुल नीळकंठ, सिद्धांत घुले, वसंत घुले, दिलीप ठाणगे, विलास वाघ, अभिजीत चकोर, श्रीराम घुले, सुदाम बढे, भाऊसाहेब घुले, निवृत्ती घुले, अनिल घुले, आकाश वाघ, अमोल कोकाटे, योगेश ठाणगे, ललित नीळकंठ, अक्षय वाघ, रमेश घुले यांच्यासह श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रारंभी स्नेहलता कोल्हे यांनी कै.एकनाथ घुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. प्रशांत घुले यांनी सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवा केली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. बदलती जीवनशैली व चुकीच्या आहार पद्धतीने आज प्रत्येकाचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराला बळी पडावे लागते.

आजच्या गतिमान युगात कितीही धावपळ असली तरी प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्याचे कार्य होत असते. त्यामुळे अशी शिबिरे सातत्याने झाली पाहिजेत. प्रशांत घुले हे सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कार्य नेहमीच करत असतात. कै. एकनाथ घुले यांच्या ७५ व्या जयंतीचे औचित्य साधून प्रशांत घुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करून एक चांगला पायंडा आहे, असे कौतुकोदगार त्यांनी काढले.

प्रशांत घुले यांनी कुंभारी गावच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी व त्यांच्या सामाजिक उपक्रमांसाठी आपण सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या शिबिरात श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे डॉ. लक्ष्मण बागडे, डॉ. सायली ठोंबरे, डॉ. भोईर, डॉ. भाकरे, डॉ. उबाळे, डॉ. मेहरबानसिंग पोथीवाल, डॉ. हकील, डॉ. कुलकर्णी आदी अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्तदाब, मधुमेह, ई. सी. जी., मेंदू व मणक्याचे विकार, स्लीप डिस्क, पाठदुखी,

गुडघेदुखी, नेत्र विकार, मूतखडा, स्त्रियांचे सर्व प्रकारचे आजार, हृदय विकार, अस्थमा, क्षयरोग, दातांचे आजार, आतड्यांचे सर्व प्रकारचे आजार, छाती दुखणे, छाती, जठर, अन्ननलिका, आतडे, मूत्रपिंड, मूत्राशय, थायरॉईड, तोंडाचा कॅन्सर, प्लॅस्टिक सर्जरी आदी रोगांची मोफत तपासणी करून योग्य ते औषधोपचार केले. यावेळी रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली. या शिबिरात कुंभारी व पंचक्रोशीतील असंख्य नागरिकांनी सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेतला. सूत्रसंचालन वाल्मीक नीळकंठ व अतुल नीळकंठ यांनी केले.