सर्वच क्षेञात सध्या विश्वासाहर्तेचा दुष्काळ – डॉ. उदय निरगुडकर

संजीवनी उद्योग समुह व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने पञकार दिन साजरा 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०८ : सध्या जनतेचा पोलीसांवर, विद्यार्थ्यांचा विद्यापीठावर, विद्यापीठाचा विद्यार्थ्यांवर, शिक्षकांचा विद्यापीठावर विश्वास राहिला नाही. विश्वासाचा दुष्काळ सर्वञ परसलेला असताना त्याची लागण होण आणि त्याचं प्रतिबिंब पञकारीतेतुन दिसणं लोकांच्या दृष्टीने घातक व धोक्याची सूचना आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले.

कोपरगाव येथील संजीवनी उद्योग समुह व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथील सभागृहामध्ये पञकार दिन व कोपरगाव राहता तालुक्यातील सर्व पञकारांनी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उदय निरगुडकर हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. स्नेहलता कोल्हे होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितिन कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, सचिव अंबादास अंञे यांची उपस्थिती होती.

कोपरगाव राहता तालुक्यातील पञकारांनी सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. उदय निरगुडकर पुढे म्हणाले की, प्रसिध्दी माध्यमात जीवघेणी स्पर्धा सुरु झाली आहे. वर्तमानपत्र, न्यूज चॅनल, मोबाईल पञकारीता व यु टूब पञकारीता हे एकाच वेळी सुरु आहे. यामध्ये आपलं महत्त्व टिकवून राहणं आवश्यक आहे. पञकारीतेत विश्वासाहर्ता नसेल तर त्याचा टाॅकटाईम वाढणार कसा असा सवाल उपस्थित करून निरगुडकर पुढे म्हणाले सध्या माणुस चांगला आहे, या पेक्षा तो भरवशाचा असला पाहिजे हेच महत्वाचे आहे. ञस्त, व्यस्त, सुस्त, स्वस्त आणि केवळ पाच टक्के मस्त माणसं सर्वञ आहेत. 

मस्त असलेली माणसं कधीच ञस्त व सुस्त नसतात त्यांच्यामुळेच आजची पञकारीता चालली आहे. पञकारीतेत स्पर्धा तीव्र झाली आहे. तंञज्ञान गतिमान झाले. तरीही हिच पाच टक्के मस्त माणसं इतिहास घडवू शकतात बाकीचे इतिहासच वाचतात. असे म्हणत देश विदेशातील अनेक दाखले देत आजच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेञावर लक्ष वेधले. 

यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, पञकारांनी आपली विश्वासार्हता टिकवून आपल्या विचारांशी प्रामाणिक राहुन पारदर्शक अभ्यासपूर्ण पञकारीता केली पाहिजे. केवळ राजकीय टिका टिप्पणीला महत्व न देता देश हिताचे प्रश्न मांडता आले पाहिजे. पञकारामध्ये सकारात्मक भाव असला पाहिजे. सध्या गल्लीतील भाषा माध्यमांमध्ये प्रसिद्ध होते. ज्यांचे समाजाप्रती कसलेही योगदान नाही अशांना प्रसिध्दी दिली जाते. 

प्रसिद्धी मिळते म्हणून काहीही बोलले जाते. माध्यमं कितीही गतिमान झाले तरीही जनतेचा विश्वास वर्तमानपत्रावर आजूनही टिकुन आहे. तो विश्वास त्यांनी टिकुन ठेवला आहे असे म्हणत कोल्हे यांनी उपस्थित पञकारांना आपुलकीचा सल्ला दिला तसेच पञकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित पञकारांना मान्यवरांनी शुभेच्छा देत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सर्व विभागांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.