मकर संक्रातीला कोपरगाव तालुका शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ – औताडे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना धाडसी निर्णय घेत विकासाला गती दिली. मात्र, स्वार्थासाठी राज्यातील आमदार, खासदार त्यांना सोडून गेले परंतु जनता मात्र, त्यांच्यासोबत राहिली. तालुक्यातील शिवसैनिक स्वाभिमानी असून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व एकत्र येत आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे.

त्यासाठी शिवसैनिकांनो कामाला लागा असे आवाहन करत जनतेचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मकर संक्रातीला कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यालयाचा शुभारंभ करणार असल्याचे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नितीन औताडे यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे उद्धव बाळासाहेब ठाकरे कोपरगाव तालुका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, भगीरथ होन, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, ग्राहक संरक्षण कक्षाचे मुकुंद सिनगर, युवा सेना राज्य सचिव भैया तिवारी, तालुकाप्रमुख बाळासाहेब रहाणे, शहर प्रमुख सनी वाघ, अशोक नवले, प्रवीण शिंदे, सर्जेराव कदम, सरपंच अमोल औताडे, माजी सरपंच संजय गुरसळ, संजय दंडवते, धर्मा जावळे, शिवाजी जाधव, अभिषेक आव्हाड, कर्णा जावळे, अक्षय गुंजाळ, रंगनाथ गव्हाणे, रामनाथ थोरात, तुकाराम पाचोरे, संदीप पाचोरे, नवनाथ शिंदे, प्रकाश रोहमारे, विनायक मुजगुले, शरद घारे, विजय गोर्डे, परसराम शिंदे, निलेश लांडगे, शिवाजी दहे साहेबराव कंकराळे, राहुल गवळी, संजय गुंजाळ, शरद गवळी, अशोक पवार, सुरेश शिरेदार, राजु शेख, दिपक वाघ, बाळासाहेब राऊत अदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाची बांधणी पुन्हा गावागावातून होणे गरजेचे असल्याने शिवसेनेच्या शाखा वाढवण्यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी निळवंडे कालव्याला खऱ्या अर्थाने चालना दिली. तेराशे कोटी रुपयांची निधी आपल्या खासदारांमार्फत त्यांनी मंजूर करून घेतला. मात्र, याचे श्रेय दुसरेच घेत आहे.

उद्धव ठाकरे आजारी असताना 40 आमदारांनी व 13 खासदारांनी गद्दारी केली. मात्र, निष्ठावान त्यांच्यासोबत राहिले. कोपरगाव तालुक्यातील एकही शिवसैनिक त्यांच्या सोबत गेला नाही ही अभिमानाची बाब आहे. आता गडतट विसरून हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी बरोबर काम करा. शिवसेना पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा व सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी भगीरथ होन यांनी सर्वांचे आभार मानले.