शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबाची जयंती शुक्रवारी येथील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व मराठा पतसंस्था शेवगाव शाखेच्या संयुक्त विद्यमानाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील आखेगाव रस्त्यावरील स्वराज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच मराठा पतसंस्था दिनदर्शिकाचे प्रकाशन बुलढाण्याचे तहसीलदार शिवश्री विजय पाटील, त्यांचे सहकारी प्राचार्य सुनिल मोगरे यांचे सह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवश्री विक्रम दारकुंडे म्हणाले, हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपति शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, आणि चातुर्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ आवतरल्या नसत्या तर आजचे चित्र कसे असते याची कल्पनाच करवत नाही.
या सोहळयास ज्येष्ठनेते अरुण लांडे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक विजय देशमुख, माजी प्राचार्य शिवाजी देवढे, माजी नगरसेवक सागर फडके, सनी देशमुख, सुरेश लांडे, सुभाष जाधव, मुन्ना बोरुडे, विष्णु घनवट, महेश शेटे, राहुल देशमुख, शरद जोशी, गणेश शहाणे यांचे सह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. माऊली खबाले यांनी प्रास्ताविक केले.