शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ : कबड्डी, खो-खो आदि मैदानी खेळातून विद्यार्थ्यांचे जीवन घडण्यास मदत होते. जीवनात खिलाडी वृत्ती तयार होऊन समृध्द जीवनाचा मार्ग सुकर होतो. शेवगाव तालुका अशा असंख्य खेळाडूंनी समृद्ध असून येथील अनेक खेळाडूनी थेट राष्ट्रीय स्थरावर आपली मोहोर उमटली आहे. आमदार मोनिका राजळे व खा डॉ. सुजय विखे यांनीही नमो चषक २०२४ क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शेवगाव पाथर्डी तालुक्यातील युवा खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केल्याचा गौरव येथील सेवा निवृत क्रिडा शिक्षक एकनाथ शिरसाठ यांनी केला.
आंतरराष्ट्रीय युवादिना निमित् आ. राजळे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या लोकनेते बाळासाहेब विखे सी. बी. एस. इंग्लिश स्कुलच्या क्रिडांगणावर शुक्रवार पासून सुरु झालेल्या खो-खो व कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.टी शिंदे,
संचालिका विदुला परांजपे, प्राचार्य शशिकांत प्रधान, प्राचार्य वर्षा दारकुंडे, भाजपा किसान मोर्च्याचे बापूसाहेब पाटेकर, भिमराज सागडे, सचिन वायकर, सागर फडके, कचरू चोथे, सतिष शिरसाठ, महादेव पवार, नितीन फुंदे, राहूल बंब, क्रिडा मार्गदर्शक डॉ. किरण वाघ, रमेश लव्हाट, प्रशांत लबडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी तालुक्याचा भूमिपूत्र व खो-खोचा राष्ट्रीय खेळाडू नरेंद्र कातकडे यास अतिथीच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विष्णू घनवट यांनी प्रास्ताविक केले. युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग यांनी सुत्र संचलन केले. कैलास सोनवणे यांनी आभार मानले. पाथर्डी तालुक्यातील आदिनाथ नगरच्या व शेवगावच्या विखे माध्यमिक विद्यालयाच्या खो-खो संघाची ‘शो मॅच’ दाखवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.