शेवगाव झाले राममय

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.२२ : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राण प्रतिष्ठापना उत्सवा निमित्ताने शेवगाव शहरात गेल्या दोन दिवसा पासून जणू आयोध्याच अवतरली असून भक्तीमय वातावरणाच्या जल्लोषाने परिसर दणाणून गेला आहे. या निमित्ताने शहरातील रस्ते सडा रांगोळ्याने भगव्या ध्वज व पताकांनी सुशोभित करण्यात आले.

Mypage

प्रत्येक चौकात कमानी व श्रीरामाचे भव्य पोट्रेट भारले असून सुमधूर स्वरात श्रीराम चरित्रपर भक्ती गितांच्या ध्वनीफिती दिवसभर चालू आहेत. विविध चौकात फटाके तोफांची आतषबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून क्रान्ती चौकातील पावन गणपती मंदिरापर्यंत एक लाख फटाक्याची मोठी लड लावण्यात आली.

Mypage

त्यामुळे दिवाळीच्या आनंदाचा पुनःप्रत्यय आला. यावेळी रामभक्तांच्या उत्साहाला मोठे उधान आले होते. सोमवारी सकाळी सर्वप्रथम येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने बालाजी मंदिरात श्रीराम मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर बाजार पेठ मार्गे निघालेल्या शोभा यात्रेत समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Mypage

त्यानंतर सामुहिक हनुमान चालिसा, सुंदर कांड पठन, बालचमुंनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीरामाच्या जीवन चरित्रावर आधारित सादर केलेल्या विविध प्रसंगाने उपस्थितांची वाहवा मिळवली. महाआरती होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला. दुपारी भजन व त्यानंतर दिपोत्सवाने मंदिरासह परिसर उजळून निघाला.

Mypage

याचवेळी सकल हिंदू समाजाने केलेल्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीने शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढून येथील भक्ति मय वातावरण द्विगुणीत केले. त्यानंतर खंडोबा नगर मध्ये उभारलेल्या आयोध्या नगरीत फटाक्याची नयनरम्य, आकर्षक आतषबाजी करण्यात आली. बाजार पेठेतील श्रीराम मंदिर देवस्थानात श्रीराम प्रभूला पंचसुक्त पवमान अभिषेक महापूजा करून पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक, खालची वेस परिसरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली.

Mypage

यावेळी आयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपन स्क्रिन वर दाखविण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याशिवाय तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात व्यापारी मित्रमंडळने माजी आमदार चंद्र शेखर घुले यांचे उपस्थित हा सोहळा साजरा केला. जैन गल्लीतील हनुमान मित्र मंडळाने तसेच रामनगर मधील म्हसन जोगी समाजाने ही रामबाबा मंदिरात हा उत्सव साजरा करून प्रसाद वाटप केले.

Mypage

ग्रामीण भागातील गावोगावी हा उत्सव साजरा झाला असून खासदार विखे यांनी दिलेल्या साहित्याचे लाडू करून प्रसाद वाटण्यात आला. दहिगावनेच्या  ‘दधनेश्वर शिवालयात नवनाथ महाराज काळे यांच्या उपस्थितीत, ढोरजळगाव येथील श्रीराम मंदिरात, तसेच श्रीक्षेत्र अमरापूर येथील श्रीरेणुका माता  देवस्थानात देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

Mypage