कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे आयएसओ मानांकनाचे ऑडीट संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरनेणे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत गतीशील प्रशासनासाठी अहमदनगर जिल्हयात सर्वप्रथम आय. एस. ओ. मानांकन मिळविले असून त्याच्या दुस-या वर्षाचे ऑडीट नुकतेच यशस्वीरित्या संपन्न झाले आहे.

आय.एस.ओ. ९००१-२०१५ ही जागतिक पातळीवरील गुणवत्ता व्यवस्थापन असुन त्यानुरूप सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने जिल्हयात सर्वप्रथम ही गुणवत्ता प्राप्त करत मानांकन प्राप्त केले. या साखर कारखान्यात लेस पेपर कामकाजाला प्राधान्य देत दैनंदिन कामकाजाच्या तसेच शासकीय प्रशासकीयनुरूप असणा-या सर्वच बैठका संगणकप्रणालीच्या माध्यमांतुन ऑनलाईन करत प्रशासकीय कामकाजात आवश्यक ते सर्व बदल सुरू ठेवले. 

त्यामुळे त्यांनी पुनश्च एकदा आय.एस.ओ. मानांकनावर शिक्कामोर्तब केला आहे. कारखान्याच्या या कामकाजावर आय. एस. ओ. मानांकन देणा-या संस्थेच्या ऑडीटर यांनी समाधान व्यक्त करत आवश्यक तेथे आणखी काही बदल करण्यासंदर्भात सुचना दिलेल्या आहेत. तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आय. एस. ओ. २०२२ कडे वाटचाल सुरू असुन त्याबाबत कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अवलंब करण्याचे धोरण व्यवस्थापनाने स्विकारत पुढील वाटचाल चालु ठेवली आहे.