कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : कोपरगाव येथील तिळवण तेली समाजाचे संत जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष प्रयत्न करून राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांच्या निधीतून सुमारे २० लाख रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. तिळवण तेली समाजबांधवांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेऊन त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
कोपरगाव शहर व तालुका तिळवण तेली समाज महिला संघटन व वैदेही महिला बचत गट, कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव येथील व्यापारी धर्मशाळेत रविवारी (२१जानेवारी) महिला स्नेहसंमेलन, हळदी-कुंकू व तिळगुळ वाटप समारंभाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी लक्ष्मी महापुरे होत्या.
यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवत कोल्हे परिवार सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन समाजकार्य करत आहे. संजीवनी महिला मंडळ व महिला बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना जनतेच्या आशीर्वादामुळे आपल्याला कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये समस्त तिळवण तेली समाजाने आपल्याला खंबीर साथ दिली. समाजकारण व राजकारण करत असताना आपण सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन काम करतो.
तिळवण तेली समाजातील नागरिकांना अडचणीच्या काळात कोल्हे परिवार व आपण स्वत: नेहमीच मदत करत आलो असून, यापुढील काळातही तिळवण तेली समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी तिळवण तेली समाजाने आगामी काळातही कोल्हे परिवाराला अशीच खंबीर साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महिला सक्षमीकरण, महिला संघटन, महिला उद्योग, महिला बचत गट या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करून काही सहकार्य हवे असल्यास नक्कीच करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रा. वृंदा कोऱ्हाळकर यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास तिळवण तेली समाज महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शारदा कर्पे, अनिता दारूणकर, लक्ष्मी महापुरे, उषा राऊत, आशा खडांगळे, ज्योती गायकवाड, निर्मला सोनवणे, उज्ज्वला शेलार, जयश्री शेलार, मनीषा चौधरी, अर्चना खडांगळे, कल्पना कर्डिले, उषा वाघचौरे, प्राची पवार, लता राऊत, जयश्रीफल्ले, सीमा कर्डिले, संगीता इंगळे, कविता धारक, तेजस्विनी आंबेकर, मोहिनी कसाब, देवडे, छाया महाले, प्रगती पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक मंदा सोनवणे, कला महापुरे, सुभद्रा राऊत यांच्यासह तिळवण तेली समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर, ज्ञानेश्वर महापुरे, बाळासाहेब राऊत, अरुण राऊत, विजय खडांगळे, बाबा कर्डिले, संतोष शेलार, रामदास गायकवाड, राहुल पवार, सुरेश सोनवणे, नीलेश धारक, सागर राऊत, दीपक कसाब, नितीन चौधरी यांच्यासह तिळवण तेली समाजबांधव व महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अर्चना खंडागळे व सूत्रसंचालन साक्षी राऊत यांनी केले तर आभार मनीषा चौधरी यांनी मानले.