उमेश भालसिंग यांची युवा मोर्च्याच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ :  भाजपा युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग यांची युवा मोर्च्याच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी ही नियुक्ती नुकतीच जाहीर केली आहे.

भाजपाचे अत्यंत निष्ठावंत युवा कार्यकर्ते म्हणून भालसिंग यांची ओळख असून युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्यात सर्वत्र अत्यंत तडफेने कार्य केले असून त्यांचा राज्यातील युवक वर्गासी दांडगा संपर्क आहे. त्यांना सामाजिक कार्याची चांगली जाण असून ‘माझी वसुंधरा’ अभियानान्तर्गत राज्यात गेली सलग दोन वर्षे प्रत्येक वर्षी दीड कोटीचे प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या आदर्श ग्राम वाघोलीचे ते प्रणेते असून याही वर्षी पारितोषिकाची हॅटट्रीक करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

त्या दृष्टीने विविध उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोलीत राबविले जात आहेत. या परिसराचे खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांचे ते कट्टर समर्थक असून नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्रअभिनंदन होत आहे. शेवगाव तालुक्यात ठिक ठिकाणी त्यांचे हित चिंतक त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देत आहेत. गुरुवारी शेवगावात सनी देशमुख, सुरेश लांडे तसेच शिवसेना (शिंदे गट) युवा सेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट, मारुती लांडे, गणेश शहाणे आंदिंनी भालसिंग यांचा सन्मान केला आहे.