देशात मोदींची आंधी पुन्हा मलाच संधी – आठवले

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०४ :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा रथ कोणीही अडवू शकत नसल्याने सध्या देशात नरेंद्र मोदी यांची आंधी आहे त्यामुळे मला पुन्हा केंद्रीत मंञीपदाची आहे संधी असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा मोदी सत्तेत येणार असल्याचे सांगितले.  

कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आरपीआय आठवले गटाच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती व संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आठवले बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, राज्याचे नेते दिपक गायकवाड, तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सुरेंद्र थोरात, प्रकाश लोंढे, श्रीकांत भालेराव, पप्पू बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कोपरगाव आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी रामदास आठवले यांचे जंगी स्वागत करताना तब्बल ४४ फुटांचा फुलांचा हार घातला तर जेसीबीने फुलांची उधळण केली. यावेळी बोलताना रामदास आठवले पुढे म्हणाले की, मी या पुर्वी शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविली होती. तेव्हा माझा पराभव झाला होता. माञ, आता पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे अशी इच्छा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले नरेंद्र मोदींनी कोपरगाव तालुक्याने मला खुप मोठे केले त्यात माजी मंञी शंकरराव कोल्हे यांचा मोठा वाटा आहे. 

 प्रसिद्धी गायिका कडूबाई खरात यांनी गायलेल्या गीतांवर तल्लीन होवून गितांचा मनमुराद आनंद घेतला. 

‘मी महाराष्ट्रात गाठले अनेक पल्ले पण माझ्या पाठीमागे होते शंकरराव कोल्हे!.’ ‘माझ्या लग्नात अनेक लोकांनी लाडू खाल्ले कारण लाडू देणारे होते  शंकरराव कोल्हे ‘.! असे म्हणत स्व.कोल्हे यांच्या आठवणींना आपल्या खास शैलीत आठवलेंनी उजाळा दिला. ते पुढून म्हणाले उद्धव ठाकरेंचा महाआघाडी सोबत जाण्याचा निर्णय चुकीचाच ठरला शिवसेनेत उद्धव ठाकरे एकटेच असून त्यांच्या सोबत केवळ दहा-बारा आमदार आहेत. ठाकरेच आम्हाला सोडून गेले. ठाकरे तिकडे (महाघाडीत) गेले आणि त्यांचे सर्व आमदार इकडे आले.

केंद्रातील एनडीए सरकार मजबूत असून सरकारला रोखण्याची ताकद कॉंग्रेसचे राहुल गांधी यांच्यात नाही. भारत जोडो ऐवजी त्यांनी कॉंग्रेस जोडो यात्रा काढावी. कॉंग्रेस सोडून गेलेल्यांना परत पक्षात आणून पक्ष पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करावा. हि भारत जोडो यांत्रा नसून फोडो यात्रा असल्याचा आरोप आठवले यांनी यावेळी केला. देशात दळववळणाची साधने वेगाने वाढत आहे. जनधन योजनेचे पन्नास कोटी खाते उघडण्यात आले. विना अट मुद्रा योजनेच तब्बल ४२ कोटी लोकांनी लाभ घेतला आहे.

दहा कोटी पेक्षा जास्त लोकांना उज्वल गस मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून चार कोटी नागरिकांना घरे मिळाली, अजून तीन कोटी लोकांना घरे मिळणार आहे. ८० कोटी लोकांना पुढील पाच वर्षे मोफत धन्य पुरवठा केला अज्णार आहे. एक कोटी तरुणांना कौशल्य देण्यात आले. त्यामुळे केंद्रातील एन डी ए व राज्यातील महायुती सरकारला कुठलीच चिंता नाही.

मल्लिका अर्जुन खर्गे हे दलित असल्याने कॉंग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला. त्यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही. नाईलाज म्हणून त्यांना पक्षाचे अध्यक्षपद दिले गेले. पंतप्रधान होऊ शकत नाही हे माहित असल्यानेच त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले जात असल्याची टीका मंत्री आठवले यांनी यावेळी केली. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडून केंद्रीय मंत्री आठवले यांच्या कार्याचे कौतून करीत संविधानाचे महत्व सांगितले.