जमिनीच्या वादावरून एकाचा मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी, दि०५ : जमिनीच्या वादाच्या भांडणात एका वृद्धाला झालेल्या मारहाणीत त्याचा जीव गेल्याची दुर्घटना जोहरापूर नजीकच्या ढोरा वस्ती परिसरात रविवारी दुपारी घडली. या संदर्भात दानेश शहादेव भारस्कर (वय २५) रा. राम नगर शेवगाव याने दिलेल्या फिर्यादी वरून शेवगाव पोलिसानी काही तासातच दहा आरोपींना चतुर्भूज केले असून दोन आरोपी फरार झाले आहेत त्यांचा शोध सुरु आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, आजीच्या नावावर असलेली दिड एकर शेत जमिन जो पर्यंत नावावर करुन देत नाही तो पर्यंत फिर्यादीच्या बहिणीस आरोपी शिवाजी भारस्कर याचा भाचा अमोल घाडगे हा नांदवनार नाही असे सांगितल्याने फिर्यादी व साक्षीदार हे आरोपी यांना समजावुन सांगत असतांना आरोपीने फिर्यादीचे वडील शहादेव भारस्कर यांचे छातील लाथ मारली असता ते बेशुद्ध पडल्याने त्यांना खासगी दवाखान्यात नेले असता ते मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मयत शहादेव भारस्कर यांचे राहते घरी आरोपी शिवाजी विश्वनाथ भारस्कर, हरिभाउ महादेव भारस्कर, दादा उर्फ अमर शिवाजी भारस्कर, गणेश राजेंद्र आव्हाड (फरार) महेश राजेंद्र आव्हाड, आदेश बापु नेटके, सनी लक्ष्मण अडागळे रा. जोहरापुर, सविता रंजित काते रा. रामनगर शेवगाव, ज्योती सनी अडागळे (फरार) रा. जोहरापुर ता. शेवगाव, सिताबाई महादेव भारस्कर, सीमा नारायण घाडगे, दुर्गा राजेंद्र आव्हाड रा. रामनगर शेवगाव हे पांढ-या रंगाचा टाटा जीप गाडी क्र.एम.एच.१४ ई.एम. ४३५५ व दोन दुचाकी मोटारसायकलने वस्तीत जाऊन आरोपीनी हातात कु-हाड, लोखंडी गज, लोखंडी पाईप व लाकडी काठ्या असे घेवुन गेले.

त्यावेळी फिर्यादी व साक्षीदार हे वरील आरोपी यांना समजावुन सांगत असतांना आरोपींनी फिर्यादीचे वडील शहादेव भारस्कर यांचे छातील लाथ मारली. त्यावेळी साक्षीदार हा सोडण्यासाठी पळत गेला असता त्यास आरोपी याने त्याचे हातातील कु-हाडीने जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारले. त्यावेळी इतर साक्षीदार हे भांडण सोडविण्यास गेले असता त्यांना सुध्दा मारहाण करून तेथुन वाहनाने निघुन गेले. शहादेव भारस्कर हे बेशुध्द अवस्थेत जमीनीवर पडल्याने त्यांना औषधोपचारकामी खाजगी हॉस्पटिल मध्ये दाखल केले असता ते मयत असल्याचे सांगितले.                

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी तपासाची चक्रे फिरवुन वेगवेगळी दोन पोलीस पथके रवाना करुन नाकाबंदी लावुन आरोपीचा शोध घेतला. आरोपी हे टाटा जीप या गाडीमधुन पैठण रोडने पळुन जात असतांना पोलीस पथकाने काही तासातच वरील दहा आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी दोन आरोपी फरार होण्यात यशश्वी झाले.

ही कारवाई उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील. यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. भदाणे, सपोनि प्रशांत कंडारे, पोसई निरज बोकील, पोसई लहाने, पोहेकॉ दराडे, पोहेकॉ नाकाडे, पोना उमेश गायकवाड, पोकॉ शाम गुंजाळ, पोकों धाकतोडे, पोकॉ एकनाथ गर्कळ, यांचे पथकाने केली. पुढील तपास पोनि प्रशांत कंडारे व पोकों मोहिते हे करत आहेत.