संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या पाच अभियंत्यांची नोकरीसाठी निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०५ : दरवर्षी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अंतिम वर्षाचे सम सत्र सुरू झाले की कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट नामांकित कंपन्यांच्या मानव संसाधन विभागास कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यासाठी पाचारण करते.

यानुसार अलिकडेच आय टी व कॉम्प्युटर क्षेत्रातील पाच कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेवुन एकुण पाच नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड करून त्यांना सुरूवातीस वार्षिक  पॅकेज रू ४. ५ लाखांपर्यंत देवु केले आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पत्रकात दिलेल्या माहितीनुसार नेटविन कंपनीने आयटी विभागाच्या संकेत चंद्रभान शेळके याची निवड केली आहे. फोसिअल वर्क्स सोल्युशन्स कंपनी व मायपकोट इन्फोटेक कंपनी या दोनही कंपन्यांनी आयटी विभागातील संकेत श्रीराम दवंगे याची निवड केली आहे. करमॅक्टस सिस्टिम कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागातील प्रतिक प्रकाश सोनार याची निवड केली आहे. तर विंजित टेक्नॉलॉजिस या कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागातील आदित्य नितिन ढोले व हर्षालीनी बाळु पांढरे यांची निवड केली आहे.

यानंतर अनेक कंपन्यांचा ड्राईव्ह नियोजीत असुन मागील वर्षांचा नोकरी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा आकडा व मागील वर्षाचे उच्चांकी पॅकेज या दोनही बाबी चालु वर्षी अधिक असण्यासाठी व्यवस्थापन, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट व सर्व विभाग प्रयत्नशील असल्याचे पत्रकात शेवटी म्हटले आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले नवोदित अभियंते, त्यांचे पालक तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. विशाल तिडके, विभाग प्रमुख डॉ. धनंजय क्षिरसागर व डॉ. माधुरी जावळे यांचे अभिनंदन केले आहे.