संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयात आ. बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : संग्राम निवासी मूकबधिर विद्यालय व डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयात माझा वाढदिवस साजरा केला जात आहे. या विशेष मुलांमध्ये वाढदिवस साजरा केल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. या मुलांमध्ये काम केल्याने विशेष पुण्य मिळते त्यासाठी इतरत्र कुठे जाण्याची गरज नाही. डॉ. सुधीर तांबे व त्यांची टीम अतिशय चांगले काम करीत आहे. 

या शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. असा वाढदिवस कायमस्वरूपी स्मरणात राहील असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री व विद्यमान आ. बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या विशेष मुलांमध्ये झालेल्या पुस्तक तुले प्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्राम संस्थेचे सेक्रेटरी डॉ. नामदेव गुंजाळ यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. तांबे म्हणाले थोरात साहेबांच्या कुशल नेतृत्वामुळे कुठलेही अवघड काम सहजगत्या करणे सोपे होते. महाराष्ट्रातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न थोरात साहेबांनी सोडवले आहेत.

आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी यांनी एक लाख रुपयाचा धनादेश विद्यालयाला देणगी म्हणून दिला. आ. बाळासाहेब थोरात यांचा कर्णबधिर विद्यार्थ्यांनी औक्षण करून केक कापून वाढदिवस साजरा केला.

याप्रसंगी एकविरा फाउंडेशनचे अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात, अमृत वाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी साहेब, राणी प्रसाद मुंदडा, डॉ.माणिक शेवाळे, संस्थेचे खजिनदार डॉ.मच्छिंद्र घुले, डॉ.सुचित गांधी, गिरी साहेब, धुळे येथील सचिन भदाने, नागपुर चे आशीष ढोक, पी. एस. आय. भगवान मथुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मिलिंद औटी व तुषार गायकर यांनी पुस्तक तुलेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब नरोडे यांनी केले, तर आभार संग्राम संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत शिंदे सर यांनी मांडले.