बारावी बोर्ड परीक्षाची तयारी पूर्ण 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : कोपरगाव शहरातील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव, केंद्र क्रमांक ०२४१ या ठिकाणी बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी पूर्ण झाली. या वर्षी बोर्ड परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत अवलंबली आहे. परीक्षा तणाव मुक्त वातावरणात होण्यासाठी, विद्यार्थी व पालक यांच्या माहितीसाठी केंद्र क्रमांक ०२४१ येथील बैठक व्यवस्था खालील प्रमाणे आहेत.

या केंद्रात परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा! सर्व विद्यार्थ्यांनी पेपरच्या वेळेपूर्वी अर्धा तास महाविद्यालयात उपस्थित राहावे. तसेच सोबत आयकार्ड, बोर्ड परीक्षा प्रवेश पत्र आणावे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य महाविद्यालय परिसरात आणू नये.