कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पुजन करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच चंद्रकांत लोखंडे, उपसरपंच विवेक परजणे, मार्केट कमिटी संचालक खंडूभाऊ फेफाळे, ग्रामपंचायत सदस्य तूषार बारहाते, शिवाजी गायकवाड, हभीभ शेख, सोमनाथ निरगुडे, बापू तिरमखे सदस्य काका गायकवाड लक्ष्मण परजणे, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष पंडित जमनराव भारुड यांनी प्रास्ताविक व सर्वाचे आभार मानले.