वारीतील स्वच्छता अभियानचा शंभरावा सप्ताह उत्साहात पूर्ण

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : तालुक्यातील वारी येथील जय बाबाजी भक्त परिवार, राहुल मधुकर टेके चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मार्च २०२२ सुरू करण्यात वारीत सुरू करण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाला रविवारी (दि.१८) शंभर आठवडे पूर्ण झाले. त्या निमित्ताने गावातील गोदावरी नदीपात्रासह सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. 

या अभियानांतर्गत प्रत्येक रविवारी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत महाश्रमदान सोहळ्यातून वारीसह परिसरातील सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाण, सार्वजनिक रस्ते, सर्व शाळा, सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, मंदिर, मज्जिद, बुद्धविहार, चर्च, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, बाजारतळ, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरासह गोदावरी नदी पात्रात गेले शंभर आठवडे वारंवार स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यातून गावात मोठ्या प्रमाणात स्वच्छता झाली आहे. याच दरम्यान गेल्या दोन वर्षात पावसाळ्यामध्ये तननाशक फवारणीचे आठ-आठ दिवस विशेष अभियान राबविले आहे. त्यामुळे वारीसह परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता झालेली आहे. यातून साथीच्या आजारांसह डासांचे प्रमाण कमी झाले आहे. 

या स्वच्छता अभियानात स्वच्छतादूत मधुकर टेके, प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश कानडे, सेवानिवृत बँक अधिकारी रावसाहेब जगताप, जय बाबाजी भक्त परिवाराचे भाऊसाहेब टेके, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव, सेतू सेवा केंद्राचे संचालक रवींद्र टेके, माहिती अधिकार कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधव,

पोस्टमास्तर संजय कवाडे, विलास गाडेकर, पंडित लकारे, नवनाथ कवडे, अजित मेहेरे, गोरख जठार, राहुल मधुकर टेके चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रोहित टेके, ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, सतीश गायकवाड, पुणतांबा येथील बबन थोरात यांनी अभियानात आपले श्रमरुपी योगदान दिले.