भगवंताच्या भक्तीसाठी चित्ताची आवश्यकता- बोरुडे महाराज

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : भगवंताच्या भक्ती करता चित्ताची एकाग्रतेची आवश्यकता आहे. भक्ती करत असताना चित्तपूर्वक केली पाहिजे. व्यवहारात कोणतेही काम असो ते चित्तपूर्वक करायला पाहिजे. अन्यथा त्यात बिघाड झाल्याशिवाय राहत नाही. असे सांगून भगवान परमात्मा आम्ही तुझी भक्ती करतो पण या भक्ती करता तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. हे चित्त एकाग्र करण्यासाठी तू आम्हाला सहकार्य कर अशी विनवणी तालुक्यातील श्रीक्षेत्र भावी निमगाव येथील जगदंबा माता मंदिराचे महंत  ह.भ.प.अशोक महाराज बोरुडे यांनी केली.

        प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी चालू महिनाभर जगदंबा माता  मंदिरामध्ये पहाटे चार ते सहा काकडा भजन व आरती नियमाने केली  गेली. या कार्यक्रमाची सांगता सोमवारी पहाटे चार ते सहा या वेळेत बोरुडे महाराज यांच्या कीर्तन रुपी सेवेने झाली. या कार्यक्रमासाठी गावातील भाविक भजनी मंडळ महिला भजनी मंडळ तसेच दहिगाव ने, रांजणी, मठाचीवाडी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरलीधर पाटील काटे यांनी काकडा भजन समाप्ती निमित महाप्रसादाचे आयोजन केले.