कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ तालुक्यातील तिन गावचे सामुहिक दशक्रिया विधी पार पडणाऱ्या घाटावर श्री साई सेवा प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या हायमँक्सचे लोकार्पण सर्पमित्र शिवा भोंगळ यांच्या दशक्रिया विधी निमित्त करण्यात आले.
या प्रंसगी जेष्ठ नेते निव्रुत्ती कोळपे, कचरु कोळपे संचालक सुर्यभान कोळपे, माजी सरपंच गोरख कोळपे, डॉ. आय. के. सय्यद, पत्रकार माणिक उगले, अशोक भुजबळ, गणेश कोळपे, सुकदेव माळी, संस्थचे अध्यक्ष रमेश भोंगळ यांच्या हस्ते पार पडले. गोदावरी उजवा कँनाल सुरेगाव पाच चारी या ठिकाणी कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगाव थडी या तिन गावचे सामुदायिक दशक्रिया पार पडतात.
सकाळी नऊच्या आत पिंडाला होणारा काक स्पर्श कर्मफलश्रूतीची अनुभूती देणारा असल्याने घाट नेहमीच गजबजलेला असतो. दशक्रिया विधी निमित्त येणाऱ्या अडचणी ओळखुन श्री साई सेवा प्रतिष्ठान सेवा भावी संस्थेच्या वतीने लोक सहभागातून दशक्रिया विधी घाट परिसर विकास कार्यक्रमा अंतर्गत हायमँक्सचे लोकार्पन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रमेश भोंगळ यांनी दिली.