कासली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियंका मलिक बिनविरोध निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची समजल्या जाणाऱ्या कासली येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या प्रियंका ज्ञानेश्वर मलिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मलिक यांच्या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कासली ग्रामपंचायतमध्ये कोल्हे गटाचे सर्वाधिक सदस्य असून, याआधी गतवर्षी उपसरपंचपदी मल्हारी काशीराम मलिक यांची निवड झाली होती. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदाच्या‌ निवडीसाठी शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन उपसरपंच म्हणून प्रियंका ज्ञानेश्वर मलिक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सरपंच बाळासाहेब आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस माजी उपसरपंच मल्हारी मलिक, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बाबुराव मलिक, उषाताई भास्कर मलिक, भागुबाई‌ रंगनाथ मलिक, चंद्रकला भाऊसाहेब मांडुडे‌ आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक सुधाकर पगारे यांनी काम पाहिले.

नवनिर्वाचित उपसरपंच प्रियंका ज्ञानेश्वर मलिक यांचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रावसाहेब जाधव, दादासाहेब सुंबे, प्रभाकर मलिक, गोविंद मलिक, शिवाजी भगुरे, विलास भगुरे, नवनाथ मरकड, दत्तात्रय पंढरीनाथ मलिक, ज्ञानेश्वर मलिक, बाळू आहेर, भाऊसाहेब मांडुडे, दिगंबर जमधडे, सुनील मलिक, बाबासाहेब सुंबे, तुकाराम भगुरे, भानुदास मांडुडे, भगवान सुंबे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.