पोहेगाव प्रभागातील पाच शाळेचे एकत्रित स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

कोपरगाव प्रतिनिधी दि.२४ :  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आज उच्च पदावर काम करत असून मी देखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचाच विद्यार्थी आहे. गेल्या दहा वर्षात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी शिक्षणाच्या बाबतीत प्रगती साधली आहे. या शाळेंना जास्तीचा निधी मिळण्यासाठी खासदार निधीतून डिजिटल क्लासरूम, संगणक व इतर बाबीवर जास्त लक्ष दिले आहे.

पोहेगाव जागृत गाव असून नितीन औताडे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास करत सर्व सामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरही लक्ष दिले आहे. आज इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थीही मराठी शाळेत दाखल होत आहे. हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षणाचे फलित असल्याचे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते.

पोहेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले व मुली, शिंदे वस्ती शाळा नवीन व जुनी, मुजगुले वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पंचकेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या पाच शाळेचे संयुक्त स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी शिवसेना नेते नितीन औताडे, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, विस्तारधिकारी धट, केंद्रप्रमुख लाडे, बाल साहित्यिक अंजली अत्रे, सरपंच अलका जाधव, बाजार समितीचे संचालक अशोक नवले,

संजय औताडे, रवींद्र औताडे, राजेंद्र ढेपले, भगीरथ रोहमारे, राजेंद्र औताडे, प्रकाश रोहमारे, विशाल औताडे, शाळेंचे मुख्याध्यापक दत्तात्रय दिघे, राजश्री डोंगरे, दिपक झावरे, बाळासाहेब गोरे, ज्ञानेश्वर सैंदाणे, मंगला गोपाळे, सुनिता सोनवणे, प्रतिभा राऊत, अनीता हरदास, उज्वला बोरसे, निलोफर शेख, भाऊसाहेब वायाळ, दिपक गोरे, आनंद खरोटे, निलिमा डोंगरे, काळू मुठे, नितीन अढागंळे, नितीन पांडे, प्रिया अहिरे अदी सह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन औताडे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण व कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलनाच्या आयोजन करण्यात येते. यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या ताणतणावातून बाहेर येतो. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक व पालकांची भूमिका महत्त्वाची असते त्यामुळे जागृत पालकांनी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून कोपरगाव तालुक्यातील अनेक शाळा डिजिटल झालेल्या आहेत.

सेवा परिसराचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री सडक योजना, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामासाठी देखील विशेष प्रयत्न केले असल्याचेही औताडे यांनी सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व गट शिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलनचे आयोजन होत आहे.

यामुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळत असल्याचे साहित्यिक अंजली अत्रे व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले. खा.सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते ड्रॉप बॉल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या गायत्री बाबासाहेब औताडे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक झावरे व प्रतिभा राऊत यांनी केले, तर आभार बाळासाहेब गोरे यांनी मानले.