कोपरगावमध्ये सर्व रोगनिदान शिबिरात १३५ रुग्णांची तपासणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : ब्राह्यण सभा, कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने कै.पुरुषोत्तम को-हाळकर यांचे स्मरणार्थ कोपरगांव शहरातील सर्वासाठी सर्व रोग निदान शिबिर रविवार दि. २५ फेब्रुवारी संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन प्रसिध्द उदयोजक नरेंद्र तथा बाळासाहेब कुर्लेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यावसायिक अविनाश सातपुते होते. 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, एस.जे.एस. हॉस्पीटलचे व्यवस्थापक लक्ष्मण बागडे, जगमोहन चिकटे, संजय कुलकर्णी, वनिता मंडळाच्या अध्यक्षा वंदना चिकटे, सुनिता को-हाळकर आदि उपस्थित होते.  

ब्राह्यण सभेच्या या उपक्रमाला आमचे कायमच सहकार्य आहे असे स्पष्ट करुन बागडे म्हणाले की, एस. जे. एस. प्रमुख चांगदेव कातकडे व संचालक प्रसाद कातकडे यांच्या मार्गदर्शना खाली एस.जे.एस. हॉस्पीटलमध्ये आधुनिक मशिनरी द्वारे रुग्णांची तपासणी होत असुन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कर्करोग तपासणी तज्ञ डॉक्टर्सच्या मदतीने होत आहे. प्रसिध्द बांधकाम प्रसाद नाईक यांनी अशा प्रकारचे सर्व रोग निदान शिबिर दरवर्षी  आयोजित करण्याचे जाहिर केले.

  या प्रसंगी उदघाटक नरेंद्र कुर्लेकर यांनी ब्राह्यण सभेचे उपक्रम चांगले असतात, त्याचे कौतुक करुन पुढील काळात ब्राम्हण सभेला सहकार्य करण्याचे जाहिर केले. या शिबिरांमध्ये रक्तदाब, शुगर, २ डी ई को, इसीजी, नेत्रविकार, फीजिओथिरेपी, इत्यादी तपासणी करण्यात आल्या. गरजुना मोफत औषधे देखिल वितरीत करण्यात आली. या शिबिरात अनुभवी तज्ञ डॉक्टर यांचे वतीने रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन व सल्ला दिला गेला. ज्या रुग्णांना पुढील तपासणीची आवश्यकता आहे अशा रुग्णांना हॉस्पीटल मध्ये निमंत्रित करण्यात आले आहे. 

प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवर आणि तज्ञ डॉक्टरच्या पथकांचे स्वागत ब्राह्यण सभेचे सहसचिव संदीप देशपांडे यांनी केले. भगवान परशुराम  यांचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करुन शिबिराची सुरुवात करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर्या महाजन यांनी केले तर आभार उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांनी मानले. या शिबिराचा लाभ १३५ रुग्णांनी घेतला. 

जनार्दन स्वामी हॉस्पीटलचे वैदयकीय पथकांमध्ये डॉ. लक्ष्मण बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सिद्धेश भोईर, डॉ. सिंग, डॉ. आकांक्षा कुलकर्णी, डॉ. जगदाळे, डॉ. मनीषा सपकाळ, डॉ. अनिरुद्ध उबाळे तसेच वैदयकीय विभागाचे प्रमुख तुषार कोतकर आदींचा समावेश होता.

 शिबिर यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र जवाद सचिव सचिन महाजन, खजिनदार जयेश बडवे, सहखजिनदार योगेश कुलकर्णी, संघटक महेंद्र कुलकर्णी, कार्यकारीणी सदस्य वसंतराव ठोबरे, संजीव देशपांडे, डॉ. मिलिंद धारणगांवकर, अनिल कुलकर्णी, डॉ. श्रध्दा जवाद, अजिंक्य पदे, सदाशिव धारणगांवकर आदिनी विशेष परीश्रम घेतले.