शेवगाव प्रतिनिधी, दि.२६ : संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात, शनिवारी सकाळी १० ला रविदास महाराजांच्या प्रतिमेची पुजा करण्यात आली, त्यावेळी तालुक्यातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर दुपारी १ वा कार्यक्रम स्थळी ह.भ.प. रामायणाचार्य मारुती महाराज झिरपे यांच्या सुमधूर वाणीत रविदास महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रवचन झाले.
यावेळी महाराजांनी जगतगुरु रविदास महाराज यांनी आई वडिलांची सेवा केली, आणि तीच शिकवण भक्त पुंडलिकानी ही सांगितली. आजच्या तरुण पिढीने ही आई वडिलांची सेवा करावी व जाती प्रथा नस्ट करावी असा संदेश दिला. दुपारी महाआरती करण्यात आली.
सद्गुरु जोग महाराज सेवा संस्थानचे प्रवर्तक, गुरुवर्य राम महाराज झिंझुर्के यांच्या शुभहस्ते शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्याललयाचे प्राचार्य प्रा. शिवदास दगडू सरोदे व ख्यातनाम कला शिक्षक शितलकुमार विठ्ठल गोरे यांना समाजभूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष नवनाथ कवडे यांनी सर्वांचे स्वागत केले. बंडू रासने, अशोक शिंदे, लक्ष्मण टाचतोडे, जगदीश धूत, डॉ. नीरज लांडे, अशोक तरटे, राजेंद्र तरटे, राजू गांगे, बाबुलाल हनवते, शिवाजी काटे, विष्णू पाठे, अभिजीत आव्हाड, भाऊसाहेब पवार, सायली सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रवीण भारस्कर, संजय खेडकर, संतोष जाधव, कैलास तिजोरे, किरण काथवटे, गाणेश तरटे, गंगा खेडकर, गणेश हणवते, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब पाचरणे, युवा तालुका अध्यक्ष महेश शेवाळे, सचिव रवी हनवते, कार्याध्यक्ष भाऊराव कांबळे, शहर अध्यक्ष शुभम बन्सवाल उपस्थित होते.