आशुतोष काळे आमदार हे कोपरगाव मतदार संघाचे भाग्य – अशोक रोहमारे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : दिव्यांग बांधवांसाठी मसीहा असणारे व मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने धडपड करून मोठ्या प्रमाणात निधी मिळवणारा व अल्पावधीत मतदार संघाचा कायापालट करणारे आमदार काळे यांच्या रूपाने भेटले हे कोपरगाव मतदार संघाचे भाग्य असल्याचे गौरवद्गार कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी काढले. 

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे. सोमैय्या महाविद्यालयात कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग, मुंबई, साधू वासवानी मिशन पुणे व के.जे. सोमैय्या महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत कृत्रिम अवयव व फिजिओथेरपी शिबिराचे’ उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना अशोक रोहमारे बोलत होते की, आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत कृत्रिम अवयव व फिजिओथेरपी शिबिराचे’ माध्यमातून दुर्दैवाने हात, पाय गमावलेल्या दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव दिले जाणार असून त्यांच्यावर मोफत फिजिओथेरपी उपचारही केले जाणार आहेत. 

पुढे बोलतांना रोहमारे म्हणाले की, मूकबधिर विद्यालय सुरु केले, त्यावेळी हे मूकबधिर विद्यालय चालविण्यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी मला मदत केली केंद्र सरकारकडून देखील त्यांनी ५ लाख रुपये अनुदान मिळवून दिले आहे. त्यावेळी त्यांचे सहकार्य असल्यामुळे मूकबधिर विद्यालय चालवू शकलो. उच्च शिक्षित असलेल्या आ. आशुतोष काळे यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी आहे.

राज्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना हा एकमेव कारखाना असा आहे की, जो कारखाना आ. आशुतोष काळे यांनी कर्जमुक्त करून नफ्यात आणला आहे. मी देखील कारखान्याचा सभासद असून या कारखान्याचा सभासद असल्याचा मला अभिमान आहे. शेतकरी, महिला, दिव्यांग बांधव, विद्यार्थी, नागरिक समाजातील सर्वच घटकांच्या समस्या सोडविण्याचे काम आ.आशुतोष काळे करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. आशुतोष काळे म्हणाले की, दिव्यांग बंधू-भगिनींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी दिव्यांग बांधवांना आवश्यक असणारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मतदार संघातील दिव्यांग बंधू-भगिनींना अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये तपासणी करीता जाण्यासाठी मागील तीन वर्षापासून दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी मोफत बस सेवा अविरतपणे सुरु आहे.

आ. आशुतोष काळेंमुळे मतदार संघाची प्रगती सुरु आहे. कोपरगाव शहराचा जटील झालेला अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलावासाठी १३१.२४ कोटी निधी त्यांनी मंजूर करून आणला असून हे काम प्रगतीपथावर आहे. मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आ.आशुतोष काळे अजून पंधरा वर्ष कोपरगावचे आमदार राहणे गरजेचे आहे. कारखान्याचे चेअरमन व आमदार असतांना देखील त्यांना गर्व अभिमान अजिबात नाही. मतदार संघासाठी आणलेल्या निधीतून रस्त्यांची कामे सुरु आहेत. गावोगावी अनेक पाणी योजनांचे कामे सुरु असून त्यांची कामगिरी भूषणावह आहे. – अशोक रोहमारे

त्या माध्यमातून आजपर्यत जवळपास एक हजार दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे. अपंग भवन बांधण्याऐवजी व्यापारी संकुल उभारण्याच्या सूचना करून कोपरगाव शहरात विविध ठिकाणी व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. सार्वजनिक कामाबरोबरच समाजामध्ये निराधार व दिव्यांग बंधू-भगिनींना आधार देण्याचे काम करीत असून यापुढेही करीत राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

यावेळी कम्युनिटी फिजिओथेरपी विभागाचे डॉ. पोथीराज पिचायी, साधू वासवानी मिशनचे सुशील ढगे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी, विश्वस्त जवाहर शहा, संदीप रोहमारे, के.जे. सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव, मिलिंद जाधव, डॉ. रिद्धी गोराडिया, डॉ. अभिजित नाईकवाडे, डॉ. संजय दवंगे, डॉ.एस.के. बनसोडे, संतोष गंगवाल, योगेश गंगवाल, आदींसह राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, 

विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, विद्यार्थी तालुकाध्यक्ष कार्तिक सरदार, डॉ. तुषार गलांडे, बाळासाहेब रुईकर, मुकुंद इंगळे, सुनिल बोरा, शुभम लासुरे, विकास बेंद्रे, रुपेश वाकचौरे, बाळासाहेब बारसे, गणेश लकारे, नारायण लांडगे, संतोष शेजवळ, अमोल आढाव, जय बोरा, रोहन कांबळे, साईश क्षीरसागर आदींसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.