श्री.क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थानात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : तालुक्यातील नागलवाडी येथील श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थानात महाशिवरात्री उत्सवा निमित्ताने श्री. क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, विष्णुसहस्त्रनाम गाथा, भजन, श्रीराम कथा हरिपाठ, तसेच हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.      

शनिवार दि.२ मार्च पासून सुरु होणाऱ्या सप्ताहात अनुक्रमे शंकर महाराज बडे, महंत रामगिरी महाराज, नवनाथ महाराज शास्त्री, सत्यवान महाराज लाटे, महंत बालकदास महाराज, कैलास गिरी महाराज, देविदास म्हस्के शास्त्री हरी कीर्तन सेवा करणार आहेत. 

शेवटी शनिवारी दि.९ रोजी सकाळी मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होणार आहे. भाविकानी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.