पाच लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : कोपरगावमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी बंद घराचे कुलुप तोडून दिवसा व राञी चोऱ्या होत होत्या. मोटारसायकली, मोबाईलसह अनेक ऐवज लुटीचा प्रकार सुरु होता. नागरीक तक्रारी देवून बेजार झाले. काहींनी नागरिकांनी तक्रारी देणे सोडून दिले होते. वारंवार होणाऱ्या घरफोडी, चोऱ्यांच्या घटनांमुळे पोलिसांची बदनामी होत होती. नव्याने रूजू झालेले कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आपली खास यंञणा वापरून घरफोड्या करणाऱ्या एका टोळीला आज गजाआड करुन तब्बल ५ लाख २ हजारांचा मुद्देमालासह तिघांना जेरबंद केले आहे. 

Mypage

 या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहर पोलिसांच्या पथकाला शुभम भगवान शिर्के वय- २४ वर्षे, रा. ब्रिजलाल नगर कोपरगाव हा तरुन संशयीत दृष्टया वावरताना आढळून आला. त्याला तपासासाठी ताब्यात घेवून त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता तो एका चोरांच्या टोळीत चोऱ्या करत असल्याचे निष्पन्न झाले.

tml> Mypage

शहरातील बेट भागात राहणारा महेश मोहन सोनवणे वय- २९ वर्षे व अंबिका नगर येथील ओमकार नितिन नागरे वय – २१ यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी घरफोड्या करून, मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस कर्मचारी डी. आर तिकोणे, ज्ञानेश्वर भांगरे,

Mypage

संभाजी शिंदे, विलास मिसाळ, बाळु धोंगडे, राम खारतोडे, गणेश काकडे, जालिंदर तमनर, बाबासाहेब कोरेकर, यमनाजी सुंबे, तुषार कानवडे यांच्या मदतीने विषेश पथक तयार करून घरफोड्या करणाऱ्या टोळीतील महेश मोहन सोनवणे, ओमकार नितिन नागरे व शुभम भगवान शिर्के यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून ३ मोटार सायकली, ३२ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे लगड, चांदीचे दागिण्यासह विविध कंपन्यांचे सहा मोबाईल हस्तगत केले.

Mypage

हस्तगत केलेल्या ऐवजामध्ये यामा कंपनीची २ लाखांची मोटारसायकल, ७५ हजारांची प्लॅटीना मोटारसायकल (एम. एच. १७ एबी ५७७१), ८५ हजारची प्लाटीना मोटारसायकल ( एम. एच. १७ सी. एल. ०८६४), ४५ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम, ३० हजार किंमतीचे १० ग्रॅम व २१ हजार किंमतीचे ७ ग्रॅम असे ३२ ग्रॅम सोन्याचे लगड, चांदीचे ३ शिक्के, २ अंगठ्या, एक पणती व विविध कंपन्यांचे ५२ हजारांचे ६ मोबाईल असा ५ लाख २ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली. 

Mypage

 दरम्यान पोलिसांनी अधिक तपास केला असता घरफोड्या करणाऱ्या या तिघांकडून आणखी विविध प्रकारेचे ६ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. पोलीसांच्या रडारवर असलेल्या या टोळीशी निगडीत इतर धागेदोरे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने पोलीस कसुन चौकशी करीत आहेत.

Mypage