मंजूर येथे महाशिवरात्र निमीत्त पंचमहायाग सप्ताहाचे आयोजन 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ :  तालुक्यातील श्री १००८ धर्मनिष्ठ, राजगुरू, अनंत विभूषित, महाराष्ट्र पिठाधिश्वर, महामंडलेश्वर, दत्तात्रेयरत्न महान तपस्वी सदगुरू स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या कृपाप्रेरणेने पावन झालेल्या धर्मपीठ श्रीक्षेत्र मंजुर येथे महाशिवरात्रपर्व उत्सवानिमीत्त अखंड पंचमहायाग सप्ताहाचे २ ते ९ मार्च पर्यंत आयोजन करण्यांत आले आहे. सप्ताहाचे हे पंचविसावे वर्ष आहे. याचकाळात शिवनाम जप, रूद्र सहस्रचंडीयाग, सामुदायीक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत आहे.

श्रीक्षेत्र मंजुर येथील भूमि संत शाहिर परसराम महाराज व गणेशगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे. या सर्व कार्यकमांस तालुक्यातील सर्व क्षेत्रातील भाविक तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर आजी-माजी लोकप्रतिनिधी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी, पदाधिकारी, आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

रूद्र सहस्रचंडी यागाची सांगता ९ मार्च रोजी महामंडलेश्वर शिवानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते सकाळी १० वाजता दत्त संस्थान देवगडचे उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनांने होणार आहे. त्रंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्था निलपर्वत येथील शिक्षक, विद्यार्थी वृंद व मंजुर पंचक्रोशीतील सर्व भाविक आदिंचे विशेष सहकार्य मिळत आहे. तर महाशिवरात्रदिनी ८ मार्च रोजी सकाळी ७ ते ९ या काळात सिध्देश्वर रूद्राभिषेक व निशानपुजा, त्यानंतर मुकुट मिरवणुक तर दुपारी ४ वाजता स्वामी शिवानंदगिरी महाराज यांचे जाहिर प्रवचन होईल.

सालाबादप्रमाणे याही वर्षी हभप दिपक महाराज एखंडे (२ मार्च), हभप महेंद्र महाराज नलावडे (३ मार्च), हभप देविदास महाराज म्हस्के (४ मार्च), हभप ज्ञानेश्वर महाराज सुडके (५ मार्च), हभप महंत रामानंदगिरीजी महाराज (६ मार्च), हभप योगेश महाराज धात्रक (७ मार्च), हभप प्रभाकर महाराज कावळे (८ मार्च), यांचे रात्रौ ९ ते ११ या काळात किर्तनाचे आयोजन केले आहे.

आचार्य वेदमुर्ती स्वप्नील गजानन कुलकर्णी (कारवाडी), सुधाकर राजाराम कुलकर्णी (कोळपेवाडी), सुनिल बापूराव जोशी (सुरेगांव), सौरभ दिलीप सातभाई, शशांक विजय सातभाई, निलेश देशपांडे (हंडेवाडी), वेदशास्त्र संपन्न राजाबापू देशमुख कुलकर्णी (नाशिक), सुनिल गजानन कुलकर्णी (कारवाडी) हे महारूद्र व सहस्रचंडी महायागाचे आचार्य असणार आहेत. तर व्यासपिठ चालक म्हणून हभप रमण महाराज शेळके हे मदत करणार आहेत. तरी भाविकांनी या सर्व धार्मीक कार्यक्रमाचा लाभ घेवुन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व सढळहाताने मदत करावी असे आवाहन सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट मंजुरच्यावतीने करण्यांत आले आहे.